कोकण

''जाणकार बना, सुरक्षित राहा''

CD

swt47.jpg
02364
माणगावः येथे वित्तीय समावेशन कार्यक्रमात लाभार्थी यांना धनादेश देताना रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक पुनित पांचोली, प्रमोदकुमार द्विवेदी, नरेंद्र देवरे व बँक अधिकारी वर्ग.

‘जाणकार बना, सुरक्षित राहा’
पुनित पांचोलीः माणगावात वित्तीय समावेशन, रिकेवायसी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः आजच्या फसवणुकीच्या दुनियेत ग्राहकांनी ‘जाणकार बना ,सुरक्षित रहा’ या मंत्रानुसार वाटचाल करून स्वतःला वित्तीय साक्षर बनवले पाहिजे. हेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सततचे सांगणे आहे, असे प्रतिपादन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक पुनित पांचोली यांनी वित्तीय समावेशन व रिकेवायसी कार्यक्रमात माणगाव येथे केले.
भारतीय रिझर्व बँक, वित्तीय समावेशन व विकास विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव ग्रामपंचायतीत वित्तीय समावेशन व रिकेवायसी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन श्री. पांचोली यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रमुख प्रमोदकुमार द्विवेदी, बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे एलडीओ अरुण बाबू, डीडीएम नाबार्डच्या दिपाली माळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक बँक ऑफ इंडिया ऋषिकेश गावडे, माविमचे डीसीओ नितीन काळे, उमेदचे जिल्हा समन्वयक निलेश वालावलकर, बँक ऑफ बडोदा रिजनल मॅनेजर प्रकाश जाधव, बॅंक ऑफ इंडिया माणगाव शाखेचे शाखा प्रबंधक भरत कुमार, माणगाव सरपंच मनिषा भोसले उपस्थित होते.
यावेळी श्री. द्विवेदी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना हे सर्वसामान्य जनतेचे मुख्य आधार आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. या योजना तळागाळात पोचवण्यासाठी बँकेचे अधिकारी नियमित कटिबद्ध आहेत. बँकेच्या ग्राहकांनी येणाऱ्या नवनवीन योजनाबाबत माहिती घेतली पाहिजे. विविध व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्याची परतफेड सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे केल्यास बँकेवरील ग्राहकाचा विश्वास अधिक भक्कम राहतो.’’
श्री. देवरे म्हणाले, ‘‘सध्या समाजात अनेक भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाढती फसवणूक आणि सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी ग्राहक वर्गाने सतर्क राहणे काळाची गरज आहे. मोबाईलवरून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वेळीच जागृत झाल्यास आपण सतर्क राहू शकतो.’’
त्यांनी स्थानिक उद्योजक आणि कर्जदारांशी संवाद साधत, त्यांना नवीन व्यावसायिक संधी, आर्थिक शिस्त आणि उच्च-मूल्य ठेव ग्राहकांना बँकेत आणण्याचे आवाहन केले. यावेळी प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाखाचा परतावा देण्यात आला. यामध्ये राधिका मेस्त्री आणि प्रकाश पंदारे यांचा समावेश होता. सुत्रसंचालन बँक ऑफ इंडियाचे मार्केटिंग मॅनेजर धैर्यशील परभणीकर यांनी तर आभार जिल्हा अग्रणी प्रबंधक ऋषिकेश गावडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं'', प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

Ajit Pawar Death: अजित पवारच नाही, तर देशातील 'या' नेत्यांनीही विमान अपघातात गमावलाय जीव...

Ajit Pawar Death News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला - सचिन तेंडुलकर

अजितदादांचं जाणं अविश्वसनिय! दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना

'महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील काळा दिवस, अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि अळणी'; संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख

SCROLL FOR NEXT