rat4p6.jpg-
02338
संगमेश्वर ः तालुक्यात आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांचे स्वागत करताना शिक्षक.
---------
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे शैक्षणिक प्रगतीसाठी आदर्शवत
विजय परीट ; संगमेश्वर तालुक्यात मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शैक्षणिक प्रगतीच्यादृष्टीने अत्यंत आदर्शवत असे आहेत. येथील शिक्षक मुलांमध्ये केवळ दिलेली मुल्येच रूजवतात असं नव्हे तर, या मुलांना आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. संगमेश्वर तालुक्यातील सर्व शिक्षक हे कर्तव्यनिष्ठ आहेत, हे येथील शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहिल्यानंतर लक्षात येते, असे गौरवोद्गार संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी काढले.
शांतिलाल मुथा फाउंडेशनतर्फे संगमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. संगमेश्वर क्र. २ या शाळेत प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या वेळी शांतीलाल मुथा फाउंडेशनचे राज्य समन्वयक सुहास पाटील, देवळे बीटचे विस्तार अधिकारी बळवंतराव, प्रशिक्षणाचे तालुका समन्वयक समीर काब्दुले, केंद्रप्रमुख संदेश महाडिक, सोमनाथ सराटे, प्रमोद चिले, प्रमोद मोहिते, राजेंद्र कदम, सुलभक लालसाब मुलाणी, हरेश सावंत, शिवप्रसाद गड्डमवार, अपर्णा दायमा आदी उपस्थित होते.
या वेळी परीट म्हणाले, संगमेश्वर तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या असता तेथील शाळा पाहून आपले समाधान झाले. गावातील व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्यात उत्तम समन्वय साधून शिक्षकांनी शाळेसह विद्यार्थ्यांची केलेली प्रगती नक्कीच अभिनंदनीय आहे. या प्रशिक्षणातून शिक्षक जे काही प्राप्त करतील त्याचा उपयोग ते नक्कीच आपल्या शाळेत करू शकतील, असा विश्वासही परीट यांनी व्यक्त केला. कारभाटले हायस्कूलचे मुख्याध्यापक अत्तार यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांचा सन्मान करण्यात आला.
चौकट
मूल्यवर्धन प्रशिक्षण बीडनंतर राज्यात
मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात प्रथम बीड येथे २००९ ला झाली. या प्रशिक्षणाचा तेथे काय उपयोग झाला, याचा आढावा शांतीलाल मुथा फाउंडेशनचे राज्य समन्वयक सुहास पाटील यांनी शिक्षकांपुढे मांडला. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी हे प्रशिक्षण राज्यात सर्वत्र राबवण्याचा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यात सुरू असणारे हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने मूल्य रूजवणारे आहे, असे कौतुक पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.