कोकण

देवगडमध्ये ‘निराधार’चे १७ प्रस्ताव मंजूर

CD

02396

देवगडमध्ये ‘निराधार’चे १७ प्रस्ताव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ : येथील तालुकास्‍तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत एकूण १७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि उपस्थित समिती सदस्यांचे तहसीलदार रमेश पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
येथील तहसीलदार यांच्‍या दालनात नवनियुक्‍त तालुकास्‍तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नवनियुक्त समितीची ही पहिलीच बैठक होती. यावेळी तहसीलदार रमेश पवार, नायब तहसीलदार संतोष खरात, प्रदीप कदम यांच्यासह समिती सदस्य दिलीप वाडेकर (वाडा), शुभांगी राणे (दहिबांव), मनोज जाधव (हिंदळे), रामचंद्र कोकरे (वाघिवरे), सुहास राणे (कुवळे), वैभव करंगुटकर (वाडातर), प्रकाश राणे (हडपीड) तसेच पंचायत समिती व देवगड जामसंडे नगरपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विधवा निराधार योजनेचे ३, दिव्‍यांग योजनेचे ७ व श्रावणबाळ योजनेंतर्गत ७ असे एकूण १७ प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले. मंजूर लाभार्थ्‍यांमध्‍ये योगिता गणपत परब (इळये), सायली संदेश लोके (लिंगडाळ), सुरेखा संतोष कदम (जामसंडे), शुभम मुकेश तांबे (मुटाट), नामदेव धोंडू घाडी (मुटाट), ओवी तुषार सावंत (वळिवंडे), सिध्‍देश संतोष फाळके (विरवाडी), चंदना विजय राणे (वरेरी), प्रतिक विजय राणे (वरेरी), रमेश श्रीधर घाडी (चांदोशी), बाळकृष्‍ण सिताराम पुजारे (नाद), राजाराम गोपाळ तेली (मुटाट), रेश्‍मा रामदास लोके (लिंगडाळ), गोविंद तुकाराम पुजारे (कोटकामते), भिकाजी विठोबा शिंगाडे (वरेरी), शंकर कृष्‍णा सोमले (गोवळ), मंगेश धोंडू धुरी (चांदोशी) आदी लाभार्थ्‍यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार श्री. खरात यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT