कोकण

विठुरायाच्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

CD

rat४p११.jpg-
२५O०२३८५
रत्नागिरी : पालखीतील विठुराया.
rat४p१६.jpg-
२५O०२४१९
रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावर माऊलींना समुद्रस्नानाप्रसंगी उपस्थित भाविक. (छायाचित्र- पराग हेळेकर, रत्नागिरी).
---
विठुरायाच्या नगरप्रदक्षिणेत भक्तीचा महासागर
वैकुंठ चतुर्दशी ; ३०० वर्षांची परंपरा, विठुनामाचा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरातून विठुरायाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आज दुपारपासून सुरू झाली. रात्री उशिरा प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात पोहोचली. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणेची परंपरा जवळपास ३०० वर्षांची आहे.
अठरापगड जातीच्या आराध्य दैवताच्या लौकिकाला साजेशी व भक्तवत्सल ब्रीद मिरवणाऱ्या विठुरायाची भक्तांच्या दारी जाऊन अडीअडचणी समजून घेणारी ही नगर प्रदक्षिणा आहे. विठ्ठलभक्तांनी या प्रदक्षिणेत उत्साहाने सहभाग घेतला. ठिकठिकाणी भाविकांनी उलपे दिले.
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पालखीतील विठुरायाच्या मुखवट्याची पूजा, आरती व एक भोवती घालून नगर प्रदक्षिणा सुरू झाली. भजनांना टाळाची साथ करत भाविकांनी विठुरायाची आराधना केली. श्री विठ्ठलाची सजवलेली पालखी, बैलगाडी, टाळ, ताशांचा गजर, विठ्ठलनाम घेत वारकरी प्रदक्षिणेला निघाले. विठ्ठलमंदिर, धमालणीचा पार, गोखलेनाका, राधाकृष्णनाका, धनजीनाका, गवळीवाडा जेलरोडमार्गे गोगटे कॉलेज, काशीविश्वेश्वराच्या घाटीने विश्वेश्वर देवळात नेण्यात आली. तिथून राजीवडा रस्त्याने तेलीआळी तळ्याजवळून खडपेवठार, चवंडेवठार रस्त्याने मांडवीनाका, मांडवीतील भैरी मंदिरसमोरून नाईक फॅक्टरीजवळील रस्त्याने समुद्रकिनाऱ्यावरून नेण्यात आली. त्यानंतर पालखी पेठकिल्ला, सांबमंदिर, राममंदिर, मुरूगवाडा मिऱ्या बंदराच्या चौकातून पांढऱ्या समुद्राजवळच्या रस्त्याने पंधरामाड व परत मुख्य मार्गावर आली. तेथून परटवणेनाका, भार्गवराम मंदिर, तेथून पुढे डोंगर उतारावरच्या पायवाटेने सावंत नगर, खालच्या फगरवठारात नेण्यात आली. वरचा फगरवठार, डीएसपी बंगला, चावडीवरून धनजीनाका, राधाकृष्ण नाका, गोखलेनाका, धमालणीच्या पारावरून मंदिरात परतली. आरती, गाऱ्हाणे होऊन नगर प्रदक्षिणेची सांगता झाली.
---
चौकट १
माऊलींना निरास्नानाप्रमाणे समुद्रस्नान
दुपारी नगर प्रदक्षिणा मांडवीच्या मागील बाजूस समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली त्या वेळी पालखीतील श्री विठोबाला समुद्रस्नान घडवले. माऊलींना निरास्नान घडवले जाते त्याप्रमाणेच समुद्रस्नानाची परंपरा येथे जपली जाते. कारण, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सर्व नित्योपचार या मंदिरात होत असल्याने ही प्रथा पडली असावी, असे भाविकांनी सांगितले. समस्त रत्नागिरीकरांची सामाजिक जडणघडण आणि एकी जपणारी ही नगरप्रदक्षिणा साजरी झाली.

चौकट २
प्रत्येक मंदिरात आरती
नगर प्रदक्षिणेच्या मार्गावरील काशीविश्वेश्वर मंदिर, घुडेवठारातील एकमुखी दत्तमंदिर, किल्ल्यातील सांबमंदिर व राममंदिर, भार्गवराम मंदिर या मंदिरांमध्ये विठुरायाची पालखी नेण्यात आली. तेथे त्या त्या देवाची मनोभावे आरती करण्यात आली आणि हातभेटीचा नारळ देण्याची प्रथा आजही जपण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT