कोकण

जनजातीय गौरव वर्ष साजरे करणार

CD

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त
जनजातीय गौरव वर्ष साजरे करणार
रत्नागिरी, ता. ५ ः भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने जनजातीय गौरव वर्ष उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. या उत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यात सामाजिक, आर्थिक विकास आणि जागरूकता, शिक्षण व कौशल्य विकास, उपजीविका आणि उद्योजकता, आरोग्य आणि कल्याण, कायदा, संस्कृती आणि वारसा, पायाभूत सुविधांचा विकास तसेच शासन आणि संस्थात्मक बळकटीकरण करणे याबाबत सूचित केले आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत पंधरवडा साजरा करण्याचे केंद्र शासनाने सूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यात पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये योजनेचे संकल्प याबाबत माहिती देणे, फिल्ड टेस्ट कीटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी, पाणीगुणवत्तेबाबत माहिती देणे, पाणीपट्टी वसुली व देखभाल दुरुस्तीसंदर्भात माहिती देऊन गावात शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढणे तसेच पाणीवापर व पाणी व्यवस्थापन योजनेची शाश्वततेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, मोहिमेदरम्यान राबवण्यात आलेल्या उपक्रमाची सारांश स्वरूपात माहिती देऊन जनजातीय वर्ष अभियानाचा समारोप करण्यात येईल. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव पंधरवड्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT