कोकण

ताजे मासे खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या

CD

-rat५p२.jpg-
२५O०२५१८
रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरातील मच्छीमार्केटवर दीर्घकाळानंतर मासे खरेदीसाठी खवय्यांची झुंबड पडली.
-rat५p३.jpg-
२५O०२५१९
दर्जेदार, सुरमई, पापलेट, सरंग्यासह, बांगड्याची मोठी आवक.
----
ताजे मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी
मिरकरवाडा मच्छीमार्केटमधील चित्र; सुरमई, पापलेटला मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : गेले १५ दिवस अवकाळी पावसाच्या फेऱ्यात अडकलेला मासेमारी व्यवसाय कालपासून सुरू झाला. त्यामुळे ताजी फडफडीत मासळी बंदरात येऊ लागल्याने खवय्यांच्या मासळी खरेदीसाठी आज मिरकरवाडा बंदरातील मच्छीमार्केटवर उड्या पडला. बंदरामध्ये मच्छीमार्केट आणि मार्केटच्या बाहेर खवय्यांची प्रचंड गर्दी होती. सुरमई हजार रुपये, पापलेट ८०० तर सरंगा ६०० असा चढा भाव होता. त्याची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी झाली; परंतु अन्य मासळीऐवजी बांगडा मोठ्या प्रमाणात होता.
पावसाने गेले पंधरा दिवस धुमाकूळ घातला होता. अवकाळीच्या वक्रदृष्टीमुळे जिल्ह्यातील भात, नाचणी पीक आणि आंबा, काजू फळबागांवर विपरीत परिणाम झाला. हातातोंडाला आलेले शेतकऱ्याचे पीक या अवकाळीमुळे गेले. बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले. याचा मोठा फटका जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय असलेल्या मासेमारीलाही बसला. वाऱ्यामुळे आणि वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे सुमारे साडेतीन हजाराच्या वर नौका जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये पंधरा दिवस विसावल्या होत्या. मासेमारी बंद झाल्यामुळे मार्केटमधील मासळीची आवक थांबली. परिणामी, ताजी मासळी मिळेनाशी वेळ खवय्यांवर आली.
गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे १५ दिवस थांबलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. ताजी फडफडीत मासळी खरेदीसाठी आज मिरकरवाडा बंदरात खवय्यांनी गर्दी केली होती. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी होती. मार्केटच्या आत आणि पाठीमागच्या बाजूला मासळी खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती. विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेऊन चढ्या भावानेच मासळी विक्री केली.

चौकट
असे आहेत दर !
नियमित सहाशे ते आठशे रुपये किलोला मिळणारी सुरमई हजार रुपये किलो होती. पापलेट ८०० तर सरंगा ७०० रुपये किलोने विकला जात होता तरी खवय्यांनी दोन हजार, तीन हजाराची सुरमई, पापलेट, सरंगा खरेदी करून आपल्या जिभेचे चोचले भागवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Pune News : भाजपने कंबर कसली! मोहोळ, बीडकर, लांडगे, कुल आणि जगताप यांच्याकडे दिली महत्वाची जबाबदारी

Farmer Fraud : ऊसतोड कराराच्या नावाखाली बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक; मुकादमा विरोधात गुन्हा दाखल!

Pune Fraud : मांत्रिकाकडून दांपत्याची १४ कोटींची फसवणूक; इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडले

Pali Public Protest : पाली नगरपंचायतच्या जुलमी करवाढीविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव देणारे निवेदन!

SCROLL FOR NEXT