-rat५p१०.JPG-
२५O०२५८८
पावस ः मावळंगे गुळेकरवाडी येथील विद्युतखांब गंजलेल्या अवस्थेत असून, धोकादायक आहेत.
-------
मावळंगे-गुळेकरवाडीतील
विजेचा खांब धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः तालुक्यातील मावळंगे गुळेकरवाडी येथील विद्युतखांब मोडकळीस आला असून, कधीही घरावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. वारंवार मागणी करूनही अद्याप विद्युतखांब बदलला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मावळंगे-गुळेकरवाडी परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी लोखंडी विद्युतखांब बसवण्यात आले होते; मात्र हे खांब बसवून अनेक वर्षे झाल्याने त्यातील एक खांब गंजला असून, त्याला भोके पडली आहेत. त्यामुळे तो कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे. याचा फटका अनेक घरांना बसणार आहे. तातडीने हा खांब बदलण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात ग्राहक नीलेश गुळेकर म्हणाले, हा विद्युतखांब जेव्हा या भागांमध्ये वीज आली तेव्हा बसवण्यात आल्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंजला आहे. याबाबत विद्युत कंपनीशी पत्रव्यवहार करूनही तो मोडून पडण्याची व अपघात घडण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.