-rat५p५.jpg-
P२५O०२५४६
रत्नागिरी ः कांचन डिजिटलतर्फे घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
----
सुयश रायकरांचा पन्हाळा प्रथम
किल्ले बांधणी स्पर्धा ; विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः कांचन डिजिटल फोटोतर्फे दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत रत्नागिरी शहरातील वरचा फगरवठार येथील स्वस्तिक प्रतिष्ठानच्या सुयश रायकर यांनी बनवलेल्या पन्हाळा किल्ल्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ही स्पर्धा रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी आयोजित केली होती.
किल्ला बांधणी स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे ः सुयश रायकर (पन्हाळा किल्ला- वरचा फगरवठार), ओम तोडणकर (सिंहगड-कुर्ली) आणि श्रीश डाफळे (तोरणा-वरचा फगरवठार) यांना गौरवण्यात आले. विशेष उल्लेखनीय पारितोषिक- युवराज विभुते (रायगड-परटवणे), कोहिनूर हेरिटेज मित्रमंडळ (सुवर्णदुर्ग-मांडवी रोड) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक- कोहिनूर ब्लॉसम सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सिद्धार्थ तोडणकर यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. विजेत्या छोटे मावळे असलेल्या मुलांच्या पालकांनी कांचन डिजिटलच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पारितोषिक वितरण समारंभाला भैरी देवस्थान अध्यक्ष मुन्ना सुर्वे, रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघ अध्यक्ष राजू कीर, रत्नागिरी माउंटेनिअर्स अध्यक्ष वीरेंद्र वणजू, अनबॉक्सचे संचालक गौरांग आगाशे, नाना पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.