कोकण

न्यू मांडवे धरणावरील वीजनिर्मिती कागदावरच

CD

- rat६p१३.jpg-
२५O०२७७५
न्यू मांडवे लघुपाटबंधारे योजनेच्या धरणाचे रखडलेले काम.
-----
‘न्यू मांडवे’वरील वीजनिर्मिती कागदावरच
धरण प्रकल्प रखडलेला; आंदोलनानंतरही ग्रामस्थांच्या पदरी निराशा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : तालुक्यातील किंजळेतर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी आणि सुकिवली या पाच गावांतील जमीन ओलिताखाली आणून परिसर सुजलाम्-सुफलाम् करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेला न्यू मांडवे लघुपाटबंधारे योजनेचा प्रकल्प ४५ वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे धरणावर प्रस्तावित असलेला दोन मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही आजतागायत केवळ कागदावरच आहे.
धरण प्रकल्पाला १९८३ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. धरणाची उंची ४४५ मीटर असून, २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता आहे. या प्रकल्पामुळे एकूण पाच गावांतील १८७७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. सांडवा ९४ मीटर तर उजवा कालवा २१ किमी इतका प्रस्तावित आहे. कालव्याच्या बहुतांश कामांचा मोठा भाग पूर्ण झाला असला तरी संपूर्ण प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. धरणासाठी ११३.४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठी २९५.३४ लाख रुपयांचे वाटपही झाले आहे. प्रकल्पग्रस्त ८४ कुटुंबांना मौजेतळे आणि मांडवे येथे प्लॉटचे वितरण करण्यात आले असून, पुनर्वसन ठिकाणी देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांपैकी बहुतांश सुविधा पूर्ण झाल्या आहेत. तरीदेखील प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्याची वाट अद्याप पाहावी लागत आहे. या रखडलेल्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तथापि, अनेक बैठका आणि दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात कामाला वेग आलेला नाही.
---
चौकट
आंदोलनानंतरही निराशा
प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ग्रामस्थ आणि जलफाउंडेशन कोकण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी गेल्या चार वर्षांत अनेक आंदोलनं केली असून, प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे येत्या २६ जानेवारी रोजी धरणाच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
---
कोट
धरणावर दोन मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून नजीकच्या गावांना वीजपुरवठा होईल अशी अपेक्षा होती; मात्र धरणाचे काम पूर्ण न झाल्याने हा प्रकल्पही अंमलात आलेला नाही. परिणामी, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फिरले असून, ‘न्यू मांडवे धरण पूर्णत्वास नेमके कधी येणार ?’ हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

- शाहू शेलार, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

Pune News : झेडपीच्या ४६ शिक्षकांवर होणार कारवाई; दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी

SCROLL FOR NEXT