कोकण

तुषार बाबर यांची बदली

CD

तुषार बाबर यांची
उपायुक्तपदी बदली
राजापूर ः रत्नागिरी जिल्हा नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त व राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची नियुक्ती झाली आहे. बाबर हे गेली काही वर्षे रत्नागिरीत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगरपालिका जिल्हा सहआयुक्त पदाचाही पदभार होता. त्यांनी रत्नागिरीबरोबरच लांजा व राजापूर येथील मुख्याधिकारीपदी काम केले होते. गेले काही महिने त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगरपालिका जिल्हा सहआयुक्त व राजापूर मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते.

सरस्वती ॲकॅडमीच्या
चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद
साडवली : देवरूख येथील प्रभाकर सनगरे यांच्या सरस्वती ॲकॅडमीतर्फे दीपावलीनिमित्त चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिल्हाभरातून रसिकांनी उपस्थिती दर्शवून कलाकारांचे कौतुक केले. देवरूखमधील कलाकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र शिंदे, किशोर भाट्ये, दिक्षा सागवेकर यांनी विविध रंगप्रकारातील वैविध्यपूर्ण विषय असलेली चित्रे रेखाटली होती. आमदार किरण सामंत, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडीक, कलाशिक्षक विष्णू परिट, अमित सामंत, शामकांत अळवणी, विजय आंबवकर, मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदींनी या वेळी भेट दिली.

नीलकंठेश्वर मंदिरात
त्रिपुरारी उत्सव
गुहागर ः तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्यावतीने श्री त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा कार्यक्रमानिमित्त सायंकाळी त्रिपुर पूजन व नियमित आरती, सायंकाळी नारायण महाराज पवार, अडरे-अनारी यांचे कीर्तन झाले. या कीर्तनात विसापूर, जामसूत, चिखली, वेळंब वचनवाडी, पाटपन्हाळे, कात्रोळी, निगुंडळ या गावातील वारकऱ्यांनी साथसंगत दिली तसेच जामसूत येथील विनेश शिरकर यांनी पखवाज वादन, अशोक कुंभार चोपदार, दत्ताराम किर्वे यांनी विणेकरी म्हणून काम पाहिले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी श्री नीलकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेशदादा वेल्हाळ, उपाध्यक्ष मोहन संसारे, सचिव सुदीप चव्हाण, खजिनदार जय गुहागरकर, सल्लागार विश्वास बेलवलकर गुरूजी, कायदेशीर सल्लागार प्रतिष्ठित वकील अॅड. सुशील अवेरे, विश्वस्त श्रीकृष्ण बेलवलकर, मनोज कोळवणकर, राजकुमार वराडकर, संजय पवार, प्रफुल्ल विखारे व सर्व सभासद तसेच सर्व भाविक यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ZP निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी, कोणत्या पक्षातून कोण जिकलं? वाचा एका क्लिकवर

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीचा विजय

Satara ZP Result 2026 : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे खंदे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना होमग्राऊंडवर धक्का; पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव

पंतप्रधानांना धोका; लोकसभेत ओम बिर्ला यांचा सल्ला आणि मोदींचा निर्णय

‘मला लग्न करायचं नाही’ ललित प्रभाकरचं वैयक्तिक आयुष्यावर भाष्य, म्हणाला...

SCROLL FOR NEXT