कोकण

उद्योगमंत्री सामंत यांचा उद्या कुडाळात सत्कार

CD

उद्योगमंत्री सामंत यांचा
आज कुडाळात सत्कार
कुडाळः येथील एमआयडीसीच्या विकासात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे गेल्या तीन वर्षांत मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने शनिवारी (ता.८) सकाळी ९ ते ११ या वेळेत येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व सेक्रेटरी अॅड. नकुल पार्सेकर यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शशिकांत चव्हाण, कुणाल वरसकर आदी उपस्थित होते. श्री. होडावडेकर म्हणाले, "आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्कार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून आमदार दिपक केसरकर, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक हणमंतराव गायकवाड, रवींद्र माणगावे, आशिष पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता उद्योजक गायकवाड यांचे उद्योजकांसाठी व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रात १० वाजता उद्योग मंत्री सामंत व मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन सोहळा, बुजुर्ग यशस्वी उद्योजक व विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा सन्मान, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT