कोकण

वंदे मातरम गीताने राष्ट्रीय एकात्मतेचा जागर

CD

rat७p१६.jpg
२५O०२९७८
मंडणगड: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करताना शिक्षण विभागातील शिक्षकवर्ग व मान्यवर.
----
मंडणगडमध्ये वंदे मातरम् महोत्सव
फेरी, नृत्यविष्कार ; वीरांना मानाचा मुजरा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः वंदे मातरम या अमर राष्ट्रगीताच्या सार्धशतीनिमित्त मंडणगड शहरात उत्साह आणि देशभक्तीच्या जयघोषात महोत्सव साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती आणि व्यापारी संघटना मंडणगड यांच्या संयुक्त सहभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला.
महोत्सवावेळी पद्मश्री दादा इदाते, प्रा. दिगंबर कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तहसील कार्यालय भिंगळोली येथून डॉ. आंबेडकर हायस्कूलपर्यंत काढलेल्या वंदे मातरम् फेरीने झाली. शहरात वंदे मातरम्, भारत माताकी जय, जय जवान जय किसान या घोषणांनी देशभक्तीचे वातावरण भारावून गेले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सुभेदार श्रीधर शिंदे (सुर्ले), शहीद रोहित मोरे (धुत्रोली) यांचे वडील रंजित मोरे तसेच स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या वेळी पूर्वा कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी वंदे मातरमवर आधारित देशभक्तिपर नृत्यविष्कार सादर केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

IND vs NZ 3rd T20I : 4,4,4,4,4,6,6,6,6 ! अभिषेक शर्माचे १४ चेंडूंत अर्धशतक; मोडला हार्दिक पांड्याचा विक्रम...

Beyond Bandish : 'बियॉंड बंदिश' कार्यक्रमात विराज जोशी यांचे 'ऑरा फार्मिंग', पहिल्याच एकल सादरीकरणात रसिकांवर गारूड

SCROLL FOR NEXT