swt722.jpg
03052
सिंधुदुर्गनगरी ः येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने वंदे मातरम गीताचे आयोजन केले होते.
जिल्हा प्रशासनातर्फे वंदे मातरमचे सामूहिक गायन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ः थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वंदे मातरम'' या गीत रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने वंदे मातरम गीताचे आयोजन केले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम गंगावणे तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवगे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, श्री श्री गावडे महाराज, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार वीरसिंह वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी ''वंदे मातरम'' विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. बऱ्याचदा आपण वंदे मातरम् या गीताच्या सुरुवातीचे शब्द ओळखतो, पण पूर्ण गीताचा अर्थ, इतिहास आणि भावना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. उद्देशही हाच आहे की आजच्या तरुणांना स्वातंत्र्य लढ्याचा आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास समजला पाहिजे. बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील या गीताचा ऐतिहासिक संदर्भ पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे. मुलांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण समाजाला परत काय देणे लागतो, याची जाणीव या निमित्ताने व्हावी, हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे प्रमुख वक्ते डॉ. सचिन सनगरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.