कोकण

सूर्यनमस्कार, योगासन स्पर्धा

CD

सूर्यनमस्कार, योगासन स्पर्धा
चिपळूण : भागवत गुरूजी पुण्यतिथीनिमित्त कोव्यास व्यायाम मंदिर, चिपळूणतर्फे लाख सूर्यनमस्कार संकल्प उपक्रमासोबत सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेचे आयोजन रविवारी ( ता. ९) सकाळी ८ वा. करण्यात येणार आहे. व्यायाम मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम राबवला जात असून, व्यायामशाळेतील मुले दररोज सूर्यनमस्कार साधना करून संकल्प पूर्णत्वास नेतात. उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये योग, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दलची आवड वाढावी या उद्देशाने यंदाही स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ७, १२, १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील खुला गट असे चार गट निश्चित केले आहेत.

माहेर संस्थेत
गुरुनानक जयंती
रत्नागिरी ः निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुनानक यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून सर्व प्रवेशीत मुलामुलींनी विश्वप्रार्थना केली. गुरुनानक यांच्याबद्दल मुलींनी उत्स्फूर्तपणे वक्तृत्व केले. माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सामाजिक, कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी गुरुनानक यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना शिखांचे धर्मगुरू गुरुनानक यांची न्याय, समता, धैर्य व मनःशांतीसाठी अध्यात्म या विचारावरती प्रकाश टाकला. गुरुनानक यांच्या विचाराने व तत्त्वानुसार मानवी जीवन सुखकर होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माहेर मुलींचे बालगृह अधिक्षिका शीतल हिवराळे माधुरी पांचाळ उपस्थित होत्या.

बार असोसिएशनमध्ये
वंदे मातरमचे गायन
रत्नागिरी ः बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीत वंदे भारत ७ नोव्हेंबर १८७५ रोजी प्रसिद्ध झाले. भारतीय अस्मितेचा आविष्कार वंदे मातरम् हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी कोलकात्याच्या काँग्रेस अधिवेशनात गायले. राष्ट्राप्रति कायम अभिमान व अखंडता जागृत करणाऱ्या गीतास आपण अभिवादन करूया, असे आवाहन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले. श्वेता जोगळेकर व दीप्ती आगाशे यांनी सुरेल स्वरात सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरममुळे वातावरण भारावून गेले. या प्रसंगी ॲड. निनाद शिंदे, ॲड. अशोक कदम, ॲड. विजय साखळकर, ॲड. रुची महाजनी, ॲड. नंदू गद्रे, ॲड. सचिन रेमणे, ॲड. शम्मी पडवेकर, ॲड. फजल डिंगणकर, ॲड. शशिकांत सुतार, ॲड. प्रशांत पाध्ये, ॲड. अतुल नवरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT