वळवणवाडी विहिरीजवळ श्रमदानातून बंधारा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील वळवणवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीजवळ श्रमदानातून विजय बंधारा बांधण्यात आला. शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धोरणाला अनुसरून आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘पाणी स्रोत बळकटीकरण’ या उपक्रमाचा हा एक भाग आहे.
मुंढरखुर्द, वळवण आणि आडीवाडी या परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसोबत एकत्र येऊन श्रमदानातून हा बंधारा उभारला. या बंधाऱ्यामुळे नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीपातळी वाढून ग्रामस्थांना वर्षभर पुरेशा पाण्याचा लाभ मिळणार आहे. या कार्यात सरपंच आमिषा गमरे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, पोलिस पाटील किरण धनावडे, वळवणवाडी अध्यक्ष अशोक गोणबरे, आडीवाडीतील प्रकाश मोरे, अनिल अवेरे, मदन धनावडे, प्रभाकर मोहित, यशवंत मोहित, तुकाराम पास्टे, रामचंद्र चांदीवडे, भरत मोरे, शांताराम जोगळे, अनंत सुवरे, करण गोणबरे, सचिन चाळके तसेच अंगणवाडी सेविका लता गोणबरे व उर्मिला बाईत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.