कोकण

देवरुखमध्ये नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ

CD

नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांत चढाओढ
भाजपपुढे आव्हान; देवरूखात सर्वसाधारण महिला आरक्षण
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ८ ः सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे घोंगावू लागले असून, राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली आहे. देवरूख नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे पुन्हा महिलाराज येणार आहे. नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांची निराशा झाली असली तरी चढाओढ कायम आहे. या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकवण्यात यश येणार की महायुती, महाविकास आघाडी सत्ता काबीज करणार, हे काही दिवसात स्पष्ट होईल.
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर २०१३ मध्ये पहिली निवडणूक झाली. त्यामध्ये अडीच वर्षाच्या कालावधीत भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता होती तर सव्वा सव्वा वर्षाच्या कार्यकालात प्रथम नीलम हेगशेट्ये आणि नंतर स्वाती राजवाडे नगराध्यक्ष झाल्या. अडीच वर्षानंतर सेना-भाजप युती संपुष्टात आली आणि अपहरण नाट्यासारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत नीलेश भुरवणे यांना नगराध्यक्षपदी बसवले. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने नगराध्यक्षपद मिळवून पाच वर्षे निर्विवाद सत्ता संपादन केली होती. नगरसेवकांच्या संख्या बळाचा विचार करता त्या वेळी राष्ट्रवादी-शिवसेना आणि भाजप-मनसे यांची समान संख्या होती. तिसऱ्या निवडणुकीत भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले होते. मनसे १, अपक्ष १, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी ४ असे पक्षीय बलाबल होते तर जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी बाजी मारली होती. त्यांनी पाच वर्षाचा आपला कार्यकाल पूर्ण केला. २०२३ नंतर प्रशासक नेमण्यात आला होता.
देवरूखमध्ये भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे पक्ष असल्यामुळे प्रत्येकाने थेट नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आघाडी, युती किंवा विकास पॅनेल असे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दुरंगी, तिरंगी की, चौरंगी लढत होणार हे येणारा काळ सांगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT