मार्गताम्हाणे महाविद्यालयास
घरडाकडून संगणक भेट
चिपळूण, ता. ८ : घरडा केमिकल्स लोटे यांनी डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ महाविद्यालय, मार्गताम्हाणे यांना पाच संगणक भेट दिले. संगणक हस्तांतरणाचा कार्यक्रम महाविद्यालयात झाला.
महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला घरडा केमिकल्सचे प्रतिनिधी, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयात ई-ग्रंथालय, एम. एस. ऑफिस आणि टॅली अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ही संगणक उपकरणे मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहेत. याबाबत प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव म्हणाले, घरडा केमिकल्सच्या या उदार योगदानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल आणि शैक्षणिक प्रक्रियेला गती मिळेल. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ. सुरेश सुतार यांनी मानले.