‘रो-रो’तून १० हजार ८६० ट्रकची वाहतूक
कोकण रेल्वे; २७ कोटींची उलाढाल, वाहतूक वाढतेय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वेस्थानक ते गोवा राज्यातील वेर्णा व कर्नाटक राज्यातील सुरखकल दरम्यानच्या कोकण रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या या रो-रो सेवेच्या माध्यमातून गतवर्षभरात १० हजार ८६० मालट्रकची वाहतूक करण्यात आली असून, ही आर्थिक उलाढाल २७ कोटी रुपयांची झाली आहे. ५ नोव्हेंबरपासून या सेवांच्या वॅगन्सची मालवाहतूक क्षमता वाढवण्यात येत असल्याने आता मालवाहतुकीत वाढ होणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.
जानेवारी १९९९ मध्ये सुरू करण्यात आलेली कोकण रेल्वेची रोल-ऑन रोल ऑफ (रो-रो) सेवा ही एक अद्वितीय आणि किफायतशीर मालवाहतूक सेवा ठरली आहे. लोडेड ट्रक थेट रेल्वेबॅगनवर वाहून नेण्यात येत असल्याने इंधनाची मोठी बचत, कार्बन उत्सर्जनात मोठी घट महामार्गावरील मालवाहू अवजड श्रेणीतील ट्रकची गर्दी कमी करण्यात यश आणि ट्रकचालकांचा थकवा दूर करण्यात मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेमार्गावर चालवल्या जाणाऱ्या या सेवाही आव्हानात्मक पश्चिम घाटाच्या भूभागातून ट्रक वाहतुकीसाठी एक अखंड आणि कार्यक्षम मालवाहतूक (लॉजिस्टिक्स) पर्याय उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरली आहे. बीआरएन वॅगन्स आणि बीओएक्स वॅगन आतापर्यंत कोकण रेल्वेने रो-रो वॅगनची मालवाहन क्षमता ५० टन होती ती वाढवून आता ५७ टन करण्यात आली आहे. ५७ टनांपर्यंत ट्रक वाहून नेण्यास सक्षम १५ बीआरएन बॅगन्स असतील. बीआरएन बॅगन्स म्हणजे सामान्यतः दोन किंवा अधिक बोगीवर आधारित असलेले मालवाहू डबे असतात. ५० टनांपर्यंतचे ट्रक वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ३५ बीओएक्स वॅगन ही एक प्रकारची उघडी मालवाहू वॅगन आहे जी प्रामुख्याने कोळसा, लोहखनिज, चुनखडी आणि इतर मोठ्या प्रमाणात वाहन नेण्यासाठी वापरली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.