rat10p6.jpg-
03517
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे विशेष पुरस्कारप्राप्त व्यक्तींसमवेत अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई आणि कार्यकारिणी सदस्य. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
सकारात्मकदृष्टीनेच चांगल्या गोष्टी घडू शकतात
शोभाताई नाखरे; कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे विशेष पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : माणसाची लहानपणापासूनच नकारात्मक बोलण्याची वृत्ती असते; पण आपण समाजात समाजभान दिसले की, चांगुलपणाचा गुणाकार केला पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे लागू नये. मन सकारात्मक असेल तर आपण असंख्य चांगल्या गोष्टी समाजात घडवू शकतो. ध्येय पक्के असले पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सकारात्मकता अंगीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका शोभा नाखरे यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे पाचजणांना विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी शोभाताईंनी सकारात्मक वृत्तीच्या अनेक उदाहरणांतून आपण कसे सकारात्मक जगले पाहिजे, या विषयी विवेचन केले. वयाच्या ८७व्या वर्षी बीए झालेल्या चटर्जी आजी, दुर्धर आजारावर मात करत फोटोग्राफीत नाव कमावणारा रत्नागिरीचा अक्षय तथा अक्की परांजपे, ‘माउंटन मॅन’ म्हणजे हातोडी, छिन्नीच्या साहाय्याने २२ वर्षे डोंगरातून रस्ता खोदणारा दसरथ मांझी अशा अनेक उदाहरणांतून सांगितले.
कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी संघाच्या कामकाजाची माहिती दिली. समर्थ भारत अभियानांतर्गत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकप्राप्त प्रवीण जोशी आणि शारदापीठ शृंगेरी येथे झालेल्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांकप्राप्त मीरा नाटेकर या दोघा भावंडांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकलने यशस्वीरित्या प्रवास करणाऱ्या डॉ. अश्विनी गणपत्ये यांच्यावतीने मुलगी व सासू-सासरे यांनी पुरस्कार स्वीकारला. पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ.अश्विनी देवस्थळी व डॉ. पंकज घाटे यांना सन्मानित केले. कार्यक्रमात मंचावर अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्य प्रतिभा प्रभुदेसाई, सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित आदी उपस्थित होते.
चौकट
सत्कारमूर्तींनी मानले आभार
मी संघाच्या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी असल्याने रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाने केलेला सन्मान घरचाच असून, याबद्दल डॉ. पंकज घाटे यांनी आभार मानले. मनाचे श्लोक व सामाजिक संस्कारासाठी मी नेहमी उपलब्ध असल्याचे प्रवीण जोशी म्हणाले. करिअर कौन्सिलिंगसाठी मी मदत करेन, अशी ग्वाही डॉ. अश्विनी देवस्थळी यांनी दिली. डॉ. गणपत्ये यांचे मनोगत मुलीने वाचून दाखवले, सायकलवरून अयोध्यावारी व हा सन्मान प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.