swt1016.jpg
03549
आजगाव ः विद्याविहार इंग्लिश स्कूलला माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट टीव्ही भेट दिला.
आजगावात वीस वर्षांनी गुरु-शिष्यांची भेट
स्नेहमेळावा उत्साहातः विद्या विहारचे सवंगडी रमले शालेय आठवणींत
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १०ः आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूलमधील २००५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा गुरुजनांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये, माजी मुख्याध्यापक तुकाराम खाणगावकर, माजी मुख्याध्यापक उमा प्रभू, प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, शिरोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक मंगेश कांबळी, माजी सहायक शिक्षक एस. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या प्रतिमेस तसेच सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित सर्वांनी यावेळी आपली ओळख तसेच सर्वांचे स्वागत केले.
या स्नेहमेळ्याव्यात उपस्थित गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याचा आनंद उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करताना शाळेतील आठवणी जाग्या केल्या. शाळेचा विकास होत असताना आपल्या ग्रुपच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत शाळेला करणार असल्याचे सांगितले, तर काहींनी शाळेची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. माजी मुख्याध्यापक खाणगावकर यांनी स्नेहमेळाव्याबाबत समाधान व्यक्त केले. आपल्या प्रशालेतील आठवणी जाग्या करत शाळेला सर्वांनी मिळून प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करूया, असे सांगितले.
श्री. पाटील यांनी, असे स्नेहमेळावे दरवर्षी आयोजित करून आपली शाळेबद्दलची ओढ अशीच टिकवून ठेवावी व आपल्या शाळेबद्दलचा आदर उत्तरोत्तर वाढवत शाळेची प्रगती साधावी, असे आवाहन केले. उमा प्रभू यांनी, सर्वांनी प्रामाणिकपणा बाळगा आणि आपली मैत्री टिकवून ठेवा, असे मोलाचे मार्गदर्शन केले. श्री. कांबळी यांनी, गावातील कलावंतांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच मोठे कलाकार घडतील, असे सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक भागीत यांनी, शाळेला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करणार असून, येथील शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमात माजी विद्यार्थांनी आपली आठवण म्हणून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान केला. तसेच परिसरात वृक्षारोपण केले. सूत्रसंचालन सर्वेश आजगावकर यांनी केले. आभार सोमा केदार यांनी मानले. यावेळी धर्माजी निकम, अण्णा पांढरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.