कोकण

एनसीसीच्या ‘कोकण विजय’ सागर नौकाभ्रमण मोहिमेचे उद्घाटन

CD

-rat१०p८.jpg-
P२५O०३५२०
रत्नागिरी : एनसीसीच्या ‘कोकण विजय’ सागरी नौकाभ्रमण मोहिमेला सोमवारपासून सुरुवात झाली. या प्रसंगी शिडाच्या नौका नेताना एनसीसी छात्र.
-rat१०p१४.jpg-
२५O०३५३५
रत्नागिरी : उद्‍घाटनप्रसंगी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, कॅप्टन जितेन जैन, संदीप कृष्ण, कमांडर रामांजुल दीक्षित आदी.
---------
‘कोकण विजय’द्वारे सागरातून नौकाविहार
नौकाभ्रमण मोहिमेचे उद्‍घाटन ; १० दिवसांची किनारपट्टीवरून भ्रमंती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : २ महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे ‘कोकण विजय’ सागरी नौकाभ्रमण मोहिमेचे उद्‍घाटन एनसीसी कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी सोमवारी भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी अल्ट्राटेक जेटी येथे केले.
‘स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण’ या संकल्पनेवर आधारित या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, एनसीसी डायरेक्टरेटचे संचालक कॅप्टन जितेन जैन, सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप कृष्ण, २ महा. एनसीसी नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. पुढील १० दिवसांमध्ये ६० नेव्हल कॅडेट्स निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरून १२७ नॉटिकल मैल सागरातून नौकाविहार करणार आहेत. यामध्ये रनपार, आंबोळगड, पूर्णगड, आणि विजयदुर्ग या महत्त्वाच्या किनारी ठिकाणांवर मुक्कामाचा समावेश आहे. या प्रवासाद्वारे कॅडेट्सना प्रत्यक्ष दिशादर्शन, किनारी भूगोल व समुद्री कार्यपद्धतींचा अनुभव मिळणार आहे.
या मोहिमेस वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई तसेच भारतीय तटरक्षक दल यांचे तांत्रिक, कार्यकारी आणि सुरक्षा साहाय्य मिळणार आहे. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेत अधिकारी २ नेव्हल अधिकारी, २ ए. एनओएनसीसी अधिकारी, १० नेव्हल स्टाफ, २ शैक्षणिक स्टाफ, २ मेडिकल स्टाफ, २ सिव्हिल स्टाफ आणि ८ राज्य शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.
---
चौकट
स्वच्छ, सुंदर कोकणचा संदेश
‘कोकण विजय’ ही मोहीम कॅडेट्समध्ये समुद्री कौशल्य, संघभावना, शिस्त, साहसी वृत्ती आणि किनारी पर्यावरण-जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली आहे तसेच स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण या संदेशाला बळकटी देत कोकणच्या सागरी वारशाकडेही लक्ष वेधण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT