कोकण

आकाशकंदील, भेटकार्ड स्पर्धेला प्रतिसाद

CD

swt112.jpg
03699
कट्टा : सेवांगणतर्फे आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध आकाशकंदील, भेटकार्ड बनविली.

आकाशकंदील, भेटकार्ड स्पर्धेला प्रतिसाद
कट्टा सेवांगणचे आयोजनः विजेत्या स्पर्धकांना आज बक्षिसांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सलग पंधराव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला. यात कट्टा दशक्रोशीतील स्पर्धक सहभागी झाले.
ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला गट अशा चार गटात घेण्यात आली. या चारही गटात आकाशकंदिलासाठी ७५ व भेटकार्डसाठी ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. याचे बक्षीस वितरण उद्या (ता. १२) मधू दंडवते यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विनिता काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
प्रामुख्याने कागदाचा वापर करून आकाशकंदील बनवण्यात आले. या सर्व कंदिलांचे व भेटकार्डांचे प्रदर्शन सेवांगण कट्टा शाखेत लावण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन किशोर शिरोडकर, बापू तळवडेकर, दीपक भोगटे, मनोज काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
आकाशकंदील स्पर्धा ः खुला गट- प्रथम वेदाश्री सावंत, स्वाती पोखरणकर, द्वितीय सानिका सावंत, तृतीय अनुजा कदम, उत्तेजनार्थ उज्ज्वला गुराम, मोहन परब. आठवी ते दहावी-प्रथम गणेश चौगुले, द्वितीय रिया गावडे, तृतीय सुयेश कदम, उत्तेजनार्थ आर्या गुराम, स्वरा भोगले. पाचवी ते सातवी-प्रथम चैतन्य मेस्त्री व खुश मयेकर, द्वितीय धनश्री निकम व यश मेस्त्री, तृतीय आर्या मेस्त्री व देवांक बांदेकर, उत्तेजनार्थ सर्वेश सीताराम, हर्षद मेस्त्री, समृद्धी गावडे, निधी वराडकर, श्रावणी चव्हाण, सानवी चव्हाण, श्रीपाद चव्हाण. पहिली ते चौथी गट-प्रथम सोनाली अपराध व हेमंत सावंत, द्वितीय रिधी नांदोसकर व रेवा कदम, तृतीय रुद्रा ढोलम, स्वरा कदम, लौकिक साळगावकर, उत्तेजनार्थ गार्गी मेस्त्री, ऋषिकेश पेंडुरकर, तपस्या धर्माजी, मानस चव्हाण.
भेटकार्ड स्पर्धा ः खुला गट-प्रथम साक्षी नाईक व चैत्राली डिचवलकर, द्वितीय आस्मा तांबोळी व प्रणाली कदम, स्वाती पोखरणकर, तृतीय गौरी आळवे. आठवी ते दहावी गट-सविता खोत व यशश्री ताम्हणकर, द्वितीय संचिता फाले व रिया गावडे, तृतीय वृषभ टेमकर, आर्या गुराम, उत्तेजनार्थ धनश्री आचरेकर, अर्चिता परब. पाचवी ते सातवी गट-प्रथम खुश मयेकर व निधी वराडकर, द्वितीय दिव्यांशू बावकर, साईश्वरी मेस्त्री, तृतीय स्वराज परुळेकर, निधी दळवी, उत्तेजनार्थ सान्वी चव्हाण, मिताली वारंग, भार्गवी आळवे, यज्ञय गोसावी. पहिली ते चौथी गट-प्रथम कार्तिकी लाड व प्राची खोत, द्वितीय ईशा पोखरणकर व रिधी नांदोसकर, तृतीय तन्वी सावंत, छायांका थवी, ईशाली साळगावकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT