कोकण

हुमरमळा वालावल गावामध्ये बंगे दाम्पत्यातर्फे मोफत दाखले

CD

swt114.jpg
03701
हुमरमळा वालावल ः पडोसवाडी येथील लाभार्थीला नवीन रेशनकार्ड आणि उत्पन्न दाखला देताना अतुल बंगे, अर्चना बंगे.

हुमरमळा वालावल गावामध्ये
बंगे दाम्पत्यातर्फे मोफत दाखले
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः हुमरमळा वालावल गावातील समाजसेवक अतुल बंगे दाम्पत्याने मोफत उत्पन्न दाखले व नवीन रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सतत सुरू ठेवला असून, यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे सहकारी म्हणून अतुल बंगे आणि अर्चना बंगे हे दाम्पत्य कार्यरत आहे. विशेष उत्पन्न दाखले असो वा रेशनकार्ड असो, एकही दिवस तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात न जाता स्वखर्चाने हे दाम्पत्य घरपोच सेवा गेली कित्येक वर्षे देत आले आहे.
या दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे स्वतः तयार करून एकदाच लाभार्थीची सही घेऊन स्वतः तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचवतात. या कामासाठी झेरॉक्स किंवा सेतू सुविधामध्ये लागणारी फी सुध्दा ते भरून मोफत सुविधा देतात. शासकीय योजनांचा लाभ गावातील लोकांना मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालयात बंगे यांच्या कामाबद्दल कौतुक केले जाते. अर्चना बंगे यांचे महिला बचतगटांचे कामही आदर्शवत आहे. हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सुमन चव्हाण यांना नवीन रेशनकार्ड आणि उत्पन्न दाखला देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Latest Marathi Breaking News : डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, पोलिस अलर्टवर

SCROLL FOR NEXT