राज्य नाट्य स्पर्धा लोगो-----------लोगो
(सदर पद्धतीने लावणे)
-rat११p६.jpg-
२५O०३६६९
रत्नागिरी ः पालशेत-गुहागर येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या ‘अकल्पित’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
कौटुंबिक वास्तव दाखवणारे
नाटक ‘अकल्पित’
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः राज्यशासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयाच्या ६४व्या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेला येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सुरुवात झाली. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत संदीप वणकर दिग्दर्शित दर्यावर्दी प्रतिष्ठान (पालशेत, ता. गुहागर) या नाट्यसंस्थेने ‘अकल्पित’ हे नाटक सादर केले. माणसाच्या जीवनातील भविष्यावर भाष्य करणारे आणि प्रेमासाठी त्याग करून निराधारांना आधार देण्याचे ध्येय बागळणाऱ्या कुटुंबाचे वास्तव कलाकरांनी अभिनयातून उभे केले आहे. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीताचा सुंदर मेळ या नाटकात पाहायला मिळाला.
---
काय आहे नाटक?
एका प्राप्तिकर अधिकाऱ्याचे कौटुंबिक वास्तव लेखक हरिश सामंत यांनी ‘अकल्पित’ नाटकातून मांडले आहे. प्राप्तीकर अधिकारी पप्पा यांना भविष्य बघण्याचा छंद असतो. प्रत्येक गोष्ट शास्त्रींना विचारल्याशिवाय ते करत नसतात. मुलगी नताशा कॉलेजला तर मुलगा शुभम डॉक्टर असतो. नताशाचा कॉलेजचा मित्र आकाश याच्याबरोबर प्रेम असते. एकेदिवशी शास्त्री प्राप्तीकर अधिकाऱ्याकडे राहण्यासाठी आकाशला पाठवतात. बंगल्यात आल्यावर आकाश आणि नताशामध्ये पुन्हा प्रेमाचा अंकूर फुलतो. नताशा आकाशला घरची हकीगत सांगते. मला आई नाही. निराधार गृहात काम करताना तापसरी येते आणि त्यात तेथील मुलांसह आईचाही अंत होतो. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लग्न केल्यानंतर एखादे मुल दत्तक घेऊन त्याचा संभाळ करणार असल्याचे नताशा आकाशला सांगते. आकाशही तिच्या प्रेमासाठी दत्तक मुलाला वाढवून संसार करण्याचे स्वप्न पाहू लागतो. इकडे प्राप्तीकर अधिकारी आकाशकडून त्याची पत्रिका घेतात व शास्त्रींना दोघांची पत्रिका बघण्यास सांगतात. ते नताशाला आकाशकडून मूल होणार नाही, संसारसुख मिळणार नाही असे सांगतात त्यामुळे ते तिच्या लग्नाला नकार देतात. ते तिच्यासाठी दुसरा मुलगा बघतात. नताशा त्या विवाहाला नकार देते. पप्पांना हृदयविकाराचा झटका येतो. मुंबईत गेलेला आकाश परत घरी येतो. नताशा वस्तुस्थिती त्याला कथन करते. आपले प्रेम इथेच संपले, असे सांगते. तिचे वडील बरे होऊन येतात. त्यांचा डॉक्टर मुलगा शुभमही घरी येतो. तो आकाशला पाहतो आणि वडिलांना त्याची हकीगत सांगतो. आकाश हा एक मवाली आहे. प्रकाश देशपांडे या नावाने तो जगत आहे. त्याचे लग्न झाले आहे. उच्चभ्रू घराण्यातील मुलींना फसवण्याचा त्याचा धंदा आहे, असे सांगून आकाशला पोलिसांच्या ताब्यात देतो. आकाशही आपली चूक झाली, असे म्हणून त्यांच्या स्वाधीन होतो. इकडे शास्त्री त्याला जामिनावर सोडवतात. शास्त्री प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या घरी येतात त्या वेळी नताशा तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी व प्रेमासाठी आकाशने स्वतः कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे सांगते. त्या वेळी आकाशने प्रेमासाठी केलेला त्याग दिसतो आणि भविष्यवाणीही खरी होते. आकाश आणि नताशा यांचे प्रेम सुकर होते, अशी कथा या अकल्पित नाटकातून सादर करण्यात आली आहे. भविष्यवाणीतील कौटुंबिक वास्तव, कलाकारांनी केलला अभिनय, नेपथ्यातून अगदी तंतोतत उभे करण्याचा प्रयत्न संस्थेने केला.
----
* सूत्रधार आणि साह्य
रंगभूषा ः श्रीकांत वायंगणकर, प्रकाशयोजना प्रशांत घवाळी, पार्श्वसंगीत योगेश मांडवकर, नेपथ्य दिलीप धामणे.
----
* पात्र परिचय
आकाश ः राकेश भोसले, बंडोपंत ः अमोल वायंगणकर, नताशा ः इषिता वणकर, शास्त्री ः गणराज धोपावकर, पप्पा ः विघ्नेश वणकर, शुभम ः आशिष दाभोळकर, इन्स्पेक्टर ः सुमित वणकर, हवालदार ः उपेंद्र दाभोळकर
----
आजचे नाटक
नाटक ः इंडियाज मोस्ट वॉंन्टेड. सादरकर्ते ः कै. संभाजीराव भोसले माजी सैनिक फाउंडेशन संचलित ऐशप्रिया आर्ट अॅकॅडमी.
स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.