‘सुखांशी भांडतो आम्ही’
नाटकाचा रंगीत प्रयोग
चिपळूण : जोशीआळी पाग येथील रंगभूमीवर गेली १५ ते १७ वर्षे सक्रिय असलेले कलाकार व दिग्दर्शक मंदार (दादू) साठे यांच्या नाट्यसंस्थेकडून राज्य नाट्यस्पर्धेसाठी सादर होणाऱ्या ‘सुखांशी भांडतो आम्ही...!!’ या नाटकाचा विशेष रंगीत प्रयोग १५ नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे. साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या नाटकात अभिनय व दिग्दर्शनाची भूमिका पार पाडल्यानंतर यंदा प्रथमच राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील तीन महिन्यांपासून नाटकाची तालीम सुरू असून, २४ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत हा स्पर्धात्मक प्रयोग सादर केला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी कलाकारांना रंगीत तालीम मिळावी, सादरीकरणातील संभाव्य त्रुटी लक्षात याव्यात आणि चिपळूणच्या रसिक प्रेक्षकांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने १५ नोव्हेंबरला प्रात्यक्षिक प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रयोगानंतर रसिकांनी सूचनांच्या रूपात प्रामाणिक अभिप्राय द्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
-------
rat11p9.jpg-
03696
विजयेंद्र जाधव
डीबीजेच्या प्रबंधकपदी
विजयेंद्र जाधव नियुक्त
चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाचे प्रबंधक अनिल कलकुटकी हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या प्रबंधक पदावर महाविद्यालयातील विजयेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, गेली ३० वर्ष महाविद्यालयात सेवेत आहेत. मागील तीन वर्षापासून कार्यालय अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. प्रबंधकपदी निवड झाल्याबद्दल जाधव यांनी संस्थेचे व महाविद्यालयीन प्रशासनाचे आभार मानले. या नियुक्तीबद्दल संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य प्रा. स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका प्रा. सुजाता खोत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
-------
पूर्णगड शाळेत
सापांविषयी मार्गदर्शन
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड नं. १ शाळेत सर्पमित्र ईशान यांनी परिसरातील आणि इतर सापांविषयी माहिती दिली. साप चावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, प्रथमोपचार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिकही दाखवले. परिसरातील साप वाचले पाहिजेत. पर्यावरण समतोलासाठी साप कसे महत्त्वाचे आहेत, सापांविषयी समज-गैरसमजबाबतही त्यांनी माहिती दिली. शाळेने राबवलेल्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, देवता डोर्लेकर यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.