सिंधुदुर्गात डिसेंबरला
राष्ट्रीय लोक अदालत
ओरोस ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. ही २०२५ या वर्षातील चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे.
.................
कुडाळात शनिवारी
आरोग्य शिबिर
ओरोस ः मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार आदी आजारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी मोफत तपासणी शिबिर शनिवारी (ता. १५) कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात आयोजित केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली. या शिबिरात एमएमआर चिल्ड्रन हॉस्पिटल ठाणे येथून न्यूरो सर्जन आणि टीम उपस्थित राहणार आहे. मुलांना चक्कर येणे, दातखिळी बसणे, डोकेदुखी, दृष्टीमध्ये बदल, वागणुकीतीतील बदल आदी लक्षणे आढळणाऱ्या व अपस्मारग्रस्त बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थ्यांना मुंबई येथे खासगी रुग्णालयात संदर्भित करून मोफत उपचार करणेत येणार आहेत. या आजारांनी ग्रस्त बालकांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांच्याशी संपर्क साधावा. येताना सोबत आदी चेकअप केलेली फाईल, सिटीस्कॅन रिपोर्ट, मागील रिपोर्ट आदी कागदपत्रे असल्यास घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.
...................
शिरोडा ग्रंथालयातर्फे
द्वैमासिक संगीत सभा
सावंतवाडी ः शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात द्वैमासिक संगीत सभा सुरू होत आहे. होतकरू व नवोदित कलाकारांना मंचप्रदर्शनाचा अनुभव यावा, मैफिल रंगविण्याचे तंत्र व उत्तम सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आदी सर्व संगीत प्रकार तसेच संवादिनी, तबला, पखावज, बासरी, गिटार, की-बोर्ड आदी सर्व वाद्य वादनही या सभेत असेल. या सभेचे पहिले पुष्प आजगाव येथील गायिका ममता प्रभूआजगावकर हिच्या गायनाने गुंफले जाईल. उद्या (ता. १२) सायंकाळी ६ वाजता र. ग. खटखटे ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. श्रीराम दीक्षित, विनय सौदागर यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.