फार्मर आयडीपासून ३५ हजार २७५ शेतकरी वंचित
चिपळूण तालुका; शेती नुकसानभरपाईत अडचणी
चिपळूण, ता. ११ : पावसामुळे तालुक्यात सुमारे ६३०.९ हेक्टरवर २ हजार ६५० इतके शेतकरी बाधित असून, नुकसानग्रस्त भातशेतीचे अद्यापही पंचमाने सुरूच आहेत. प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्याचा फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार असून, तो नसल्यास शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत. तालुक्यात ३५ हजार २७५ इतक्या शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढलेला नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
‘फार्मर आयडी’ हे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र असून, जे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. पीएम-किसान सन्मान निधीसारख्या योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले असून, याशिवाय शेतीविषयक योजना, अनुदान, विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते. तालुक्यात सध्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील १६८ गावांत हे नुकसान झाले असून, त्यानुसार या नुकसानग्रस्त शेतीचे कृषी, महसूल तर ग्रामसेवकांकडून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत. तालुक्यात ७ हजार हेक्टरवर भातशेती असून, आतापर्यंत ६३०.९ हेक्टरवरचे पंचनामे झाले आहेत. त्यामध्ये २,६५० इतके शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनामे पूर्णत्वास गेल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळतेवेळी या शेतकऱ्याचा फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे. तो नसल्यास भरपाई मिळणे कठीण होणार आहे, तशी माहिती तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे यांनी दिली.
तालुक्यात ७७ हजार ९०३ इतके नोंदणीकृत शेतकरी असून, त्यापैकी ४२ हजार ६२८ इतक्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे, तर ३५ हजार २७५ इतक्या शेतकऱ्यांनी हा आयडी काढलेलाच नाही. आयडी न काढलेल्या शेतकऱ्यांचा या शेती नुकसानीमध्ये समावेश आहे; मात्र आता फार्मर आयडीचे महत्त्व लक्षात घेता नुकसानग्रस्त शेतकरी आता हा आयडी काढण्यासाठी ‘कृषी’कडे धाव घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.