-rat११p२०.jpg-
P२५O०३७४०
साखरपा : सभेसाठी जमलेले संगमेश्वर तालुक्यातील लाकूड व्यापारी संघटनेचे सदस्य.
---------
लाकूड व्यापारी संघटनेची सभा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता ११ : संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेची सभा देवरूख येथे संघटनेचे प्रमोद कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला खजिनदार योगेश शिंदे, सचिव संतोष पाल्ये, शंकर वैद्य, अनंत तोरसकर, संतोष चव्हाण उपस्थित होते. कदम यांनी संघटनेतील कोणाही सदस्याला काम करताना कोणतीही समस्या उद्भवली तर संघटना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. तसेच व्यवसाय करताना शासनानियमांचे पालन करण्याचे आवाहन कदम यांनी केले. संघटनेचे सगळे सदस्य शेतकरी असल्यामुळे झाडे तोडून झाल्यावर दुप्पट झाडे लावली जातील, याची काळजी प्रत्येकाने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.