डेरवणमध्ये १५, १६ ला
मेंदू स्कॅन, स्ट्रोक उपचार
चिपळूण, ता. ११ : डेरवण येथील वालावलकर रुग्णालय येथे १५, १६ नोव्हेंबरला पहिल्यांदाच सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश मेंदू आणि रक्तवाहिन्यांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच स्ट्रोकच्या तत्काळ उपचारांची सुविधा कोकणातील रुग्णांना सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरासाठी मुंबई येथील डॉ. नितीन डांगे, डॉ. कुशल भाटिया, डॉ. मयूर घरात आदी तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम रुग्णालयात येणार आहे.