कोकण

आबलोली विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी महोत्सव

CD

आबलोली विठ्ठल रखुमाई
मंदिरात कार्तिकी महोत्सव
गुहागर ः तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळातर्फे आयोजित कार्तिकी एकादशी महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात झाला. विठ्ठल रखुमाई मूर्तींना अभ्यंगस्नान, सहस्रनाम व काकडआरती झाली. हळदीकुंकू, सायंकाळी हरिपाठ झाला. रात्री चितळे महाराजांचे नारदीय कीर्तन झाले. रात्री विठ्ठलनामाच्या जयघोषात देवाचा मिरवणूक पालखी सोहळा उत्साहात झाला. दुसऱ्या दिवशी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी वाघबारस हा खेळ झाला. सायंकाळी मंदिराच्या आवारातील तुळशीचा विवाहसोहळा झाला. तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा झाली. मंडळाच्यावतीने लकी ड्रॉ सोडत, आकर्षक बक्षिसे देऊन हा कार्यक्रमही उत्साहात झाला. रात्री महाराष्ट्राची लोककला भारूड हा कार्यक्रम उत्साहात झाला.
-------
राष्ट्रवादी युवक काँग्रेस
कार्याध्यक्षपदी केदारी
चिपळूण ः येथील युवा कार्यकर्ते अक्षय केदारी यांची रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते केदारी यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्रक सुपूर्द करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम उपस्थित होते.
------
डेरवणमध्ये राज्यस्तरीय
शालेय टेबलटेनिस स्पर्धा
चिपळूण ः डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात राज्यस्तरीय शालेय टेबलटेनिस स्पर्धा उत्साहात झाल्या. नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक आणि कोल्हापूर या विभागांतून २८८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. १४ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबईने सुवर्ण, छत्रपती संभाजीनगरने रौप्य व पुणेने कास्यपदक पटकावले. मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरने मुंबईचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले तर पुणे संघ तृतीय ठरला. १९ वर्षाखालील मुलांमध्ये पुणे संघाने विजेतेपद मिळवले, छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या तर कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात मुंबईने कोल्हापूरवर रोमहर्षक विजय मिळवून अव्वल स्थान मिळवले, नाशिक संघ तृतीयस्थानी राहिला. विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांचा सत्कार दिनेश पुजारी, डॉ. श्रीहरी सबनीस व सुधीर सावंत यांच्या हस्ते झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT