कोकण

सावंतवाडीत रविवारी महाआरोग्य शिबिर

CD

03965

सावंतवाडीत रविवारी महाआरोग्य शिबिर

डॉ. ऋत्विक पाटणकर ः राणी पार्वतीदेवी प्रशालेत मोफत सेवा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत रविवारी (ता. १६) आरपीडी हायस्कूल येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. मोफत सल्ला व तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. ऋत्विक पाटणकर यांनी दिली. येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘रविवारी (ता. १६) सकाळी १० ते ४ या वेळेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित या आरोग्य शिबिरात मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, पित्तशय खडे, हर्निया, मूळव्याध, ओव्हरीयन सिस्ट, आहार, गर्भाशयाच्या गाठी आदींचा मोफत सल्ला तसेच डोळे तपासणी, हिमोग्लोबीन, रक्तशर्करा, युरोफ्लोमेट्री आदी मोफत तपासण्या होणार आहेत. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या पुढील उपचारांसाठीही योग्य सल्ला या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे.’
डॉ. पाटणकर यांनी औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोवा मेडिकल कॉलेज व आता आरजी स्टोन हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. ते पुढे म्हणाले, ‘माझ्या वैद्यकीय सेवेचा जन्मभूमीतील लोकांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही आरोग्य शिबिरासारखा हा उपक्रम राबवत आहोत. यानंतर दर रविवारी सावंतवाडीत ‘आरजी स्टोन टू’च्या माध्यमातून ओपीडीही सुरू करणार आहे. सकाळी ११ ते १ या दोन तासांसाठी रुग्ण तपासणी केली जाईल. सद्यस्थितीत स्टोनसारखे आजार मोठ्या प्रमाणात मानवी शरीरामध्ये उद्भवत आहेत. वातावरणातील बदल तसेच आहार पद्धती आणि शारीरिक हालचाली या सर्व गोष्टी याला कारणीभूत आहेत. स्टोनचा परिणाम शरीरातील अन्य घटकांनाही जाणवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने स्टोनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष असणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पद्धती सुरू करणे गरजेचे आहे.’ यावेळी डॉ. भावेश पटेल, ॲड. रुजूल पाटणकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: 6 डिसेंबर रोजी मोठ्या हल्ल्याची तयारी, पण 10 नोव्हेंबरलाच केला स्फोट; दहशतीच्या डॉक्टरांचा कट कसा फसला?

Needle Free Injection: आता सुईची भीतीच नाही, सुईशिवाय देता येणार इंजेक्शन; वैद्यकीय सेवेत घडतेय नवी क्रांती!

Company Faced Major Fine : नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यानं टाकला असा डाव, की कंपनीलाच बसला मोठा दणका ; 'मोबाइल' ठरला कारण!

Delhi Bomb Blast: मोठी बातमी! दिल्ली स्फोटातील उमरची दुसरी कार जप्त, कुठे मिळाली? धक्कादायक रहस्य उघड

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

SCROLL FOR NEXT