swt131.jpg
04118
जामसंडे : येथील शिबिरात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
गोगटे विद्यामंदिरात
कायदेविषयक जागृती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ : जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. बाल अत्याचाराची कोणतीही घटना आढळल्यास बाल सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मंचावर ॲड. गिरीश भिडे, अपर्णा परांजपे, अभिषेक गोगटे, मुख्याध्यापक सुनील जाधव, एस. आर. जाधव आदी उपस्थित होते. शिबिरात कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. बाल कायद्याची माहिती देण्यात आली. सुनील जाधव यांनी स्वागत केले. एस. आर. जाधव यांनी आभार मानले.
Santosh Kulkarni
9422392533
One attachment
• Scanned by Gmail