- rat१३p३.jpg-
२५O०४१३२
बोर्ली मांडला (जि. रायगड) ः येथे रामानंदचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सायकल वाटप करताना आमदार महेंद्र दळवी, ॲड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानतर्फे
बोर्लीतील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : बोर्ली मांडला (जि. रायगड) येथील ६० मुला-मुलींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्याकडून मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. पादुकादर्शन सोहळ्याप्रसंगी हा कार्यक्रम झाला.
बोर्ली गावातील मुलींना शाळेत जाणे सोयीचे व्हावे यासाठी सायकली देण्यात आल्या आहेत, असे संस्थानतर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, भाजपचे ॲड. महेश मोहिते, सुरेंद्र मोहिते, ॲड. मनस्वी मोहिते, सरपंच राजश्री मिसाळ, अप्पण पाटील, शिवसेनेचे दीपक रानवडे, भारत बेलोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जनसामान्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. अनेकांना शिक्षणासाठी मदत केली जाते. प्रारंभी सुंदर सजवलेल्या रथांमधून सिद्ध पादुकांची दोन किलोमीटर अंतरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यात झेंडेदारी, कलशधारी महिला, भजनी मंडळ पुरुष व महिला आदींचा समावेश होता. या वेळी संतपिठावर पादुका ठेवण्यात आल्या. त्यांचे रांगेने दर्शन घेण्यात आले. या वेळी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.