कोकण

फ्लॅश आर्ट अ‍ॅकडॅमीच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

- rat१३p४.jpg-
P२५O०४१३३
राजापूर ः पखवाज प्रथमा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.
----
पखवाज परीक्षेत ‘फ्लॅश आर्ट’चे यश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः भारतीय संगीत कलापीठ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पखवाज प्रथम परीक्षेत तालुक्यातील जैतापूर येथील फ्लॅश आर्ट अ‍ॅकडॅमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांना नुकतेच जैतापूर येथे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नागरी संरक्षण दल, रत्नागिरीचे सहाय्यक उपनियंत्रक आनंदसिंग गढरी, मास्टर ट्रेनर अक्षय जाधव, राजन लाड, जब्बार काझी, जैतापूर ग्रामपंचायत सदस्य रूपेश करगुटकर, सिकंदर करगुटकर, प्रशिक्षक तन्मय परब आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते. फ्लॅश आर्ट अ‍ॅकडॅमीच्या माध्यमातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित दर रविवारी राकेश दांडेकर यांच्या निवासस्थानी प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षक तन्मय परब (राजापूर) यांनी या सर्व सात विद्यार्थ्यांना पखवाज या भारतीय तालवाद्याचे मूलभूत आणि प्रगत शिक्षण दिले आहे. परब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पखवाज वादनातील विविध ताल, बोल आणि लय यांचे उत्कृष्ट सादरीकरण परीक्षेत करून परीक्षकांची प्रशंसा मिळवली. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश संपादन करताना प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी फ्लॅश आर्ट अ‍ॅकडॅमीचे संचालक राकेश दांडेकर, राजन लाड आणि अरविंद लांजेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT