चिपळुणात १४ ते १७ ला व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. गोवा येथील नामवंत साहित्यिक प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी यांचे १४ ते १७ नोहेंबर दरम्यान विविध विषयावर व्याख्यान होणार आहे.
गोवा, कर्नाटकासह महाराष्ट्रातील विविध शहरात त्यांची व्याख्याने झाली आहेत. ग्रंथालय सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातही १४ नोव्हेंबरपासून खेड, दापोली, चिपळूण, देवरूख, पाली, लांजा व राजापूर या ठिकाणी विविध विषयावर व्याख्याने होणार आहेत. चिपळूण येथे डीबीजे महाविद्यालयाच्या सहयोगाने १७ रोजी सकाळी ११.३० वा. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ‘साहित्य आणि समाजजीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, संघ समन्वयक राकेश आंबेरकर व चिपळूण प्रतिनिधी रमेश शिंदे यांनी केले आहे.