कोकण

भारतीय वास्तुविशारद संस्थेचे रत्नागिरीत केंद्र

CD

‘भारतीय वास्तुविशारद’चे रत्नागिरीत केंद्र
आर्किटेक्ट संतोष तावडे ः १०८ वर्षांचा इतिहास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : भारतीय वास्तुविशारद संस्था ही भारतातील वास्तुविशारदांची राष्ट्रीय व्यावसायिक संघटना आहे. १९१७ ला स्थापन झालेल्या या संस्थेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरीत रत्नसिंधू केंद्र सुरू होणार आहे ही कोकणसाठी मोठी उपलब्धी आहे, अशी माहिती या केंद्राचे मानद संचालक मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तुविशारद (आर्किटेक्ट) म्हणून अनेकजण कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित आणून हे केंद्र सुरू करण्यासाठी गेली दोन-तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. आता त्याला यश आले आहे. यामुळे आर्किटेक्ट क्षेत्राकडे जिज्ञासू युवापिढी वळेल तसेच आर्किटेक्चर संदर्भाने समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र कार्यरत राहणार आहे, असे तावडे म्हणाले.
बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अशी पदवीधारक तसेच सीओएअंतर्गत आर्किटेक्ट कायद्यानुसार सनदप्राप्त आर्किटेक्टची ही संघटना आहे. या संस्थेचे आज ३० हजारांहून अधिक सदस्य आहेत. स्थापत्यकलेची सौंदर्यदृष्टी, शास्त्रीयता आणि कार्यक्षमता वाढवणे तसेच शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत दर्जा उंचावण्याकरिता संस्था विविध उपक्रम राबवते. संस्था दरमहा एक मासिक प्रकाशित करते. प्रकाशने, व्याख्याने, परिषद, प्रदर्शने इत्यादींच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधते. संस्थेचे मुख्यालय फोर्ट, मुंबई येथे असून, संस्थेची सर्व केंद्रे राष्ट्रीय परिषदेच्या मान्यतेनुसार स्वतःच्या नियमावलीनुसार चालवण्यात येतात.

चौकट १
दोन्ही जिल्ह्यांत नवनवीन उपक्रम
१२ मे १९१७ रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टर्स परिसरात वास्तुविशारद विद्यार्थी संघटना या नावाने संस्थेची सुरुवात झाली. त्यानंतर विविध टप्पे पार करत २ सप्टेंबर १९२९ रोजी भारतीय वास्तुविशारद संस्थेची स्थापना झाली. स्थापत्यकलेचा अभ्यास प्रोत्साहित करणे, व्यवसायातील मानके उंचावणे, परस्पर सहकार्याद्वारे सर्व भारतीय स्थापत्यकारांचे हितसंबंध जपणे, असे संस्थेचे उद्देश आहेत. संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशनही होत असते. या सर्व गोष्टी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात या केंद्राद्वारे सुरू करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा बदलला! प्रारूप यादी २० नोव्हेंबरला, अंतिम यादी ५ डिसेंबरला

Healthy Recipes For PCOS: मास्टरशेफ क्रिती धिमनची हेल्दी रेसिपी! 15 मिनिटांत बनवा PCOS-फ्रेंडली हाय-प्रोटीन टिक्की, पाहा Video

'या' लोकप्रिय संगीतकारासोबत दिसली सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन; एकमेकांना करतायत डेट

Man Kissing Cobra Video : भयानक!!! बहाद्दरानं चक्क ‘कोबरा’लाच केला ‘Lip lock Kiss’ ; थरारक व्हिडिओ व्हायरल

Viral News: १,२ नाहीतर... 'या' महिलेच्या पोटात तब्बल ९ बाळं वाढत आहेत, सर्वच अवाक्, डॉक्टरांनी सांगितलं कारण!

SCROLL FOR NEXT