कोकण

रेल्वे स्थानकात ‘डिजिटल डिस्प्ले’

CD

रेल्वे स्थानकात
‘डिजिटल डिस्प्ले’
रत्नागिरी ः प्रवाशांसाठी आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कोकण रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मनीषा झा यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकात अत्याधुनिक डिजिटल डिस्प्ले व्हिडिओ वॉलचे उद्‍घाटन करण्यात आले.
मडगाव रेल्वेस्थानकावर उभारलेल्या ही वॉल सुमारे २०० चौरस फूटाची आहे. याद्वारे प्रवाशांना रिअल-टाइम ट्रेन वेळापत्रक, प्लॅटफॉर्मची माहिती, प्रवासी सूचना, सुरक्षा संदेश, तसेच स्थानिक पर्यटनस्थळांची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. ही सुविधा ग्राफॉन इनोव्हेटिव्ह डिजिटल सोल्युशन्स, पालक्काड यांच्या सहकार्याने पाच वर्षांच्या कालावधीसाठी उभारली आहे. प्रवाशांना तात्काळ व अचूक माहिती मिळावी, स्थानकातील प्रवासी हालचाल अधिक सुकर व्हावी आणि एकूणच प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. कोंकण रेल्वेच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे, असे कोरेतर्फे सांगण्यात आले.
-------
मासेमारांची सुरक्षितता
हाच उद्देश ः कदम
दापोली : हर्णै बंदर हे दापोली तालुक्याचे महत्त्वाचे मत्स्यबंदर असून, या भागातील शेकडो कुटुंबांचा व्यवसाय या बंदरावर अवलंबून आहे. त्यामुळे जेटीचे बांधकाम करताना मासेमारांच्या सुरक्षिततेला, सोयीसुविधांना आणि भविष्यातील वापर क्षमतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणाने काम विलंब होता कामा नये, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केले. हर्णै बंदर येथे बांधण्यात येत असलेल्या नव्या जेटीच्या कामाची त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हे काम जलदगतीने, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे, असे सांगून कामाची गती वाढवण्याचे तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गुणवत्तापूर्ण काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
-------------
रवींद्रनाथ टागोर
यांना अभिवादन
रत्नागिरी : गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. या दिवसाचे औचित्य साधून गुरूदेवांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्युरलचे ठिकाणी रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले. टागोर यांना १३ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांना नोबेल जाहीर झाले. नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. बंगाली संस्कृतीचा साऱ्या जगाला परिचय करून देणाऱ्या रवींद्रनाथांनी साहित्य, संगीत, चित्रकला आणि शिक्षणक्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहता कामा नये, अशी त्यांची भूमिका होती. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. भारताचे जन-गण-मन तर बांगलादेशाचे आमार शोनार बांगला ही दोन्ही राष्ट्रगीताचे रवींद्रनाथ टागोर रचेते होते. श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन लिहिले आहे.
------
नाहरकत दाखले;
पालिकेमध्ये गर्दी
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अजूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपेक्षित गर्दी झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारच जाहीर न केल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे; परंतु इच्छुकांनी पूर्ण तयारी केली असून, मी पालिकेचा थकबाकीदार नाही, असा नाहरकत दाखला शौचालय असल्याचा आणि मी ठेकेदार नसल्याचा दाखला असे आतापर्यंत १८० दाखले इच्छुक उमेदवार घेऊन गेले आहेत. काही सूचक आणि अनुमोदक तर उमेदवारांकडूनच थकीत करभरणा करून घेत आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगरपालिका आणि गुहागर, देवरूख व लांजा नगरपंचायतीमध्ये येत्या २ डिसेंबरला पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: बिहारच्या विजयाचा MY फॉर्म्युला नेमका काय? मोदींनी सांगितलं विजयाचं गणित

Pune Navale Bridge Accident-Public Outrage Video : मयतीला चला... ! म्हणत, सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या पुणेकरांनी नवले पुलावरून थेट तिरडीच काढली

ए वाण्या तू गप्प बस... वर्षा उसगावकर यांनी सांगितला अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो किस्सा; म्हणाल्या, 'ते दोघे नेहमी...'

Bihar Election Result 2025 Live Updates : समस्तीपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पूल परिसर महामार्ग ‘डेथ झोन’! पाच वर्षांत अपघातांची मालिका सुरूच

SCROLL FOR NEXT