04510
रोट्रॅक्ट क्लबतर्फे बांद्यात बालदिन
बांदा, ता. १५ ः बालदिनाचे औचित्य साधत बांदा रोट्रॅक्ट क्लबतर्फे अंगणवाडी निमजगा येथे चिमुरड्यांसोबत आनंदमयी उपक्रम आयोजित करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत विविध खेळ खेळले आणि संपूर्ण वातावरण हास्य आणि आनंदाने भरून गेले. उपक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ व आकर्षक गिफ्टचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, श्रीमती सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोहन कुबडे, उपाध्यक्ष दत्तराज चिंदरकर, सचिव मिताली सावंत, सहसचिव संकेत वेंगुर्लेकर, नेहा निगुडकर, मयूर मसुरकर आदी उपस्थित होते. रोट्रॅक्ट क्लबच्या या उपक्रमामुळे बालदिनाचे महत्त्व अधोरेखित होऊन लहानग्यांना त्याची माहिती मिळाली.
..................
04511
मडुरा ः नाबर स्कूलमध्ये बालदिनी आयोजित कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक.
मडुरा नाबर प्रशालेत बालदिन
बांदा, ता. १५ ः मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे बालदिन उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानिक समिती सदस्य सुरेश गावडे, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियांका परब, पालक परेश सावंत, मुख्याध्यापिका नीती साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका हर्षदा तळवणेकर यांनी केले. आभार सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रिग्स यांनी मानले. याप्रसंगी सहशिक्षिका मयुरी कासार, स्वरा राठवड यांच्यासह पालक उपस्थित होते. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.