कोकण

कविता, गायनातून पटवले उर्दू साहित्याचे महत्त्व

CD

मिस्त्री हायस्कूलमध्ये शिक्षण दिवस उत्साहात
अल्लामा इकबाल स्मरण; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि उर्दू साहित्याचे थोर साहित्यिक व विचारवंत डॉ. अल्लामा इकबाल यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी उर्दू साहित्याचे महत्त्व दर्शवणारे विविध कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केले.
मिस्त्री हायस्कूलच्या हाजी दाऊद इस्माईल मिस्त्री ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी तालिमी इमदादिया कमिटीचे सचिव शकील मजगावकर, इम्तियाज पटेल, मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा आणि ज्येष्ठ शिक्षिका मुमताज काझी, कौसर फडनाईक, संजीदा म्हस्कर, राशीद काद्री आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उर्दू साहित्याचे महत्त्व दर्शवणारे विविध कार्यक्रम सादर केले. सातवीची विद्यार्थिनी बुशरा खानने अल्लामा इकबाल यांच्या साहित्यावर माहिती दिली तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी लबपे आती है दुआ बनके तमन्ना मेरी ही सुप्रसिद्ध प्रार्थना समूहगीताच्या माध्यमातून सादर केली. दहावीची विद्यार्थिनी अरबिया सोलकरने अल्लामा इकबाल यांच्या कविता सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली, तर सातवीची विद्यार्थिनी सहर होडेकरने इक्बाल लिखित देशभक्ती गीत सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Retention: KKR कडून आंद्रे रसेलसह २३ कोटींचा वेंकटेश अय्यर रिलीज; अजिंक्य रहाणेसह केवळ 'या' खेळाडूंनाच केलं रिटेन

Cobra vs Car Driver Viral Video : कारच्या साईड मिररमध्ये लपला होता मृत्यू, ड्रायव्हरने पाहताच... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Pune Crime : तरुणीला मारहाण व शिवीगाळ; पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल; कोथरूडमधील प्रकार!

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

कसे होते आपले महाराज? ४ वर्षाच्या चिमुकलीचा प्रश्न; गायिकेने काय दिलं उत्तर? ऐकून अंगावर काटा उभा राहील

SCROLL FOR NEXT