मनसे नगरपंचायत लढवणार ?
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५ ः गुहागर शहरातील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या मदतीने नगरपंचायत निवडणुकीत २ ते ३ जागांवर उमेदवार उभा करणार आहेत. याला अधिकृत दुजोरा मनसे पदाधिकाऱ्यांकडून मिळालेला नसला तरीही प्रभाग चार ते सहा, ११ ते १५ यापैकी कोणत्या प्रभागातून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, तिथे मनसेचे कार्यकर्ते चाचपणी करत आहेच.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोमीलन झाल्यानंतर निवडणुकांमध्ये युती होईल, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत; मात्र अधिकृतपणे आजपर्यंत अशी घोषणा झालेली नाही; परंतु काहीच दिवसांपूर्वी शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शृंगारतळीतील मनसेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र ज्या राजकीय समीकरणांची वाट पाहात आहेत त्या मनसे-शिवसेना युतीचे पहिले उदाहरण आमदार जाधव यांनी सर्वांसमोर आणले आहे. गुहागर नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून मनसे निवडणूक लढवणार आहे. त्यांना गुहागर शहरातील दोन ते तीन जागा देण्याचे आमदार भास्कर जाधव यांनी कबूल केले. प्रभाग चार ते सहा, ११ ते १५ या प्रभागांपैकी कोणत्या प्रभागातून आपण लढू शकतो, याची चाचपणी सध्या मनसे कार्यकर्ते करत आहेत. या नव्या राजकीय खेळीमुळे मनसेला नगरपंचायतीमध्ये आपले नगरसवेक जिंकून आणण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही संधी मनसे साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.