राज्य नाट्य स्पर्धा---लोगो
(१५ नोव्हेंबर पान २)
-rat१५p३.jpg-
P२५O०४४९२
रत्नागिरी ः खरडेवाडी क्रीडा मंडळ, मुंबई-मेर्वी या संस्थेच्या ‘इम्युनिटी दी वॉईस ऑफ टॉलरन्स’ नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
‘इम्युनिटी दी वॉईस’मधून
प्रतिकार, सहनशिलतेचे दर्शन
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ः कोविड-१९ च्या कालावधीत बिल्डींगचे काम करणे, रस्त्यांची कामे करणाऱ्या असंघटित कामगारांची, कोरोनातील त्यांची प्रतिकारशक्ती, त्यांची सहनशीलता यावर भाष्य करणारी संहिता डॉ. सोमनाथ सोनवलकर यांच्या लेखणीतून उतरली आहे. संहितेतील प्रत्येक प्रसंग दिग्दर्शक संदेश तोडणकर यांनी तंतोतंत उतरवले. राज्य नाट्यस्पर्धेच्या पंचमपुष्पात नाटक ‘इम्युनिटी दी वॉईस ऑफ टॉलरन्स’ खरडेवाडी क्रीडा मंडळ, मुंबई-मेर्वी या संस्थेने येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर केले. २१ कलाकारांच्या मांदियाळीत अभिनय क्षमता, नेपथ्य अशा चहूबाजूने नाटक सर्वांगसुंदर झाले.
-------
काय आहे नाटक ?
कोविड-१९च्या कालावधीत घडलेल्या घटना, असंघटित कामगारांच्या व्यथा याचे हृदय पिळवटून टाकणारी, भयावह दर्शन घडवणारी कथा इन्युनिटी दी वॉईस ऑफ टॉलरन्स या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुंबईत बिल्डींगचे काम सुरू असते. शिवा-कमी, बिरजू-लक्ष्मी, कलवा, छैनू, मारू, सलीम, सज्जन, चंपकचाचा, गजोधर, सुनीता आदी कामगार पत्र्याच्या घरात राहात असतात. दोन छोटी मुले (बहादूर व मुन्नी) मुंबई पाहण्यासाठी येतात. सुनीताला छोटे बाळ असते. एके दिवशी मुकादम सर्वांचे कामाचे पैसे देतो आणि काम चालू असताना लॉकडाउन जाहीर होते. काम बंद होते. कामगारांची उपासमार व्हायला सुरुवात होते. त्यांच्यामध्ये भांडणे सुरू होतात. स्त्री कामगार कंमो गरोदर असते. कलवाला कोरोनाची लागण होते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. सर्व कामगार गावी जायला निघतात. मुकादम त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. बिरजू व शिवा यांच्यात वाद होतो. शिवाबरोबर सर्व कामगार तसेच बिरजू नाईलाजाने चालत घरी गावाला जायला निघतात. रस्त्यात पोलिस अडवून मारहाण करतात. कामगारांचे रस्ता तयार करण्याचे महत्व कंमो पोलिसांना पटवून देते. चालत जात असताना सर्व खूप थकतात आणि त्यांच्या भाकऱ्या संपतात. शेवटी सात भाकऱ्या उरतात. शिवा हत्तीचे उदाहरण देऊन कामगारांना बळ देतो. याच दिवसात सज्जनच्या पायाला जखम होऊन पॉयझन होते, त्याचा मृत्यू होतो. गावी पायी जाताना त्याला तिथेच नदीत ढकलून देतात. भुकेमुळे मेलेल्या कुत्र्याचे पाय कामगार-मारू खातो आणि आपली व्यथा व्यक्त करतो. याच वेळी सुनीतीचे बाळ मेलेले आहे, हे सर्वांना कळते; परंतु मुलाकडे पाहून भाकरी मिळेल म्हणून ती दोन दिवस तसेच लपवून ठेवते. बाळाला शेवटी पुरण्यात येते. चालत चालत गावालगतच्या रेल्वेपटरीजवळ येतात. दोन दिवसात गावाला पोहचू, असे त्यांना कळते. रात्र होते म्हणून ट्रेन चालू नसल्यामुळे तिथेच पटरीवर झोपतात. एक मालगाडी ऑक्सिजन भरून नेत असते. ट्रेनच्या आवाजाने शिवा, लक्ष्मी आणि कंमो यांना जाग येते आणि ते बाकीच्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात; परंतु ट्रेनखाली सापडतात. परंतु कंमो, बहादूर, मुन्नी आणि चंपकचाचा वाचतात. पंचनामा करण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि वार्ताहर येतात. मुकादमसुद्धा बातमी समजल्यावर येतो. काम सुरू होण्यास परवानगी मिळते; परंतु कंमो आता यापुढे रोजंदारी करणार नाही, असे सांगते. अशातच कंमोला गरोदरपणाच्या कळा येऊ लागतात. चंपकचाचा, बहादूर आणि मुन्नी आडोसा तयार करतात. कंमो बाळंत होते. तिला मुलगा होतो. त्याचवेळी कामगारांची लहान मुले बहादूर- मुन्नी चंद्रापर्यंत रस्ता तयार करणे आणि यापुढे शिक्षण घेणे याचे महत्त्व सांगतात. शिवाचे शब्द कंमोला आठवतात. ‘सपान पाय, मोठ्ठ सपान.’ कंमो शिकवून बाळाला मोठे करणार, अशी प्रतिज्ञा करते. अशी कथा अभिनय, नेपथ्य, बालकलाकारांच्या अभिनयातून मांडण्यात संस्था यशस्वी झाली.
---
सूत्रधार आणि सहाय्य
निर्माता ः अक्षय थिएटर्स, रत्नागिरी. प्रकाशयोजना ः अभिजित डोंगरे. पार्श्वसंगीत ः योगेश मांडवकर. नेपथ्य ः ऋषी आर्टस्, नेपथ्य सहाय्य ः सुभाष तोडणकर, संदेश गुरव, वृषभ खरडे. रंगभूषा ः नरेश पांचाळ. वेशभूषा ः विश्वनाथ नवाले. रंगमंच सहाय्य ः आशिष शिंदे, अक्षय बंडबे, पार्थ देशपांडे, विनायक लिंगायत, विराज लिंगायत, शौर्य डोंगरे.
----
* पात्र परिचय
शिवा ः संदेश तोडणकर, बिरजू ः आशिष सावंत, चंपकचाचा ः शंकर वरक, छैनू ः वैभव लिंगायत, मारू ः शैलेश खरडे, कलवा ः विनय साठे, सलीम ः विजय गुरव, सज्जन ः साहिल वारिशे, गजोधर ः योगेश खरडे, बहादूर-बालकलाकार ः सोहम तोडणकर, मुकादम ः राजेश गुरव, इन्स्पेक्टर ः हेमंत चक्रदेव, हवालदार-१ विनय साठे, हवालदार -२ ः संदेश थुळ, कंमो ः तन्वी शिंदे, सुनीता ः अनुजा जोशी, लक्ष्मी ः सायली भोर, बालकलाकर-मुन्नी ः गार्गी नवाले, न्यूज रिपोर्टर ः श्रेया वरवडकर, कॅमेरामन ः प्रतीक भोसले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.