कोकण

-परशुराम हॉस्पिटलतर्फे महाआरोग्य शिबिर

CD

परशुराम हॉस्पिटलतर्फे महाआरोग्य शिबिर
चिपळूण, ता. १५ ः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाणेखुंट-लोटे येथे १९ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात विविध रोगांवरील तपासणी, मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार औषधोपचार हे सर्व पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.
शिबिरात रुग्णांसाठी रक्त व लघवी, थायरॉईड, ईसीजी आणि एक्स-रे तसेच आवश्यकतेनुसार टुडी इकोचाचणीही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे रोग, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, यकृतविकार, श्वसनविकार, दमा, जीवनशैली विकार, लठ्ठपणा, फीट्‌ससारख्या आजारांवर अनुभवी तज्ज्ञडॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. पोटाचे आजार, हर्निया, अॅपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर, फिशर, गुदविकार, मूतखडा, प्रोस्टेट, मूत्रविकार, फ्रॅक्चर तसेच विविध प्रकारच्या गाठी यावरही विशेष उपचार व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांना पुढील तीन महिन्यांपर्यंत उपचार व तपासण्यांवर २० ते ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुश्मिता पाटील, मंगेश शेठ यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malad Student Abduction Case: मालाड लिंग शस्त्रक्रिया प्रकरणात चार आरोपींना अटक, रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये नेमकं काय?

Mumbai: मुंबईत खळबळ! घरावर ईडीची धाड पडलीये अन्...; प्रेयसीला खोटं सांगितलं, ९२ लाख रुपये उकळले, प्रसिद्ध रिलस्टार अटकेत

IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

Latest Marathi Live News Update: उत्तर नागपुरात माजी वार्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या

SCROLL FOR NEXT