कोकण

सर्वंकषमध्ये बालदिन

CD

-rat१५p१६.jpg-
P२५O०४५४०
रत्नागिरी : सर्वंकष विद्यामंदिरात बालदिनी आयोजित कार्यक्रमात शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासमवेत बालदोस्त.
----
सर्वंकषमध्ये बालदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : बालदिनानिमित्त शहराजवळील सर्वंकष विद्यामंदिरात आनंदमयी वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शाळेला भेट दिली.
शाळा पाहणीदरम्यान लोहार यांनी शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची आणि शालेय वातावरणाची चौकशीही केली. मुलांशी मनमोकळ्या संवादातून बालदिनाचा आनंद अधिक रंगतदार झाला.
या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. खेळघर ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी दिवसभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि इतर मौजेचे खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यातून खेळभावना, सांघिक वृत्ती हा हेतू साध्य झाला. या दिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आवडीचा खाऊवाटप करण्यात आला. मुख्याध्यापिका मोनिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

Republic Day 2026 : देशातील ४१ गावं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच साजरा करणार प्रजासत्ताक दिन, कारणही आहे खास

Mumbai Pune Expressway Traffic Jam : दुसऱ्याही दिवशी ‘जाम’! द्रुतगती मार्गावर बोर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

प्रजासत्ताक दिनाच्या आधी राजस्थानात मोठी कारवाई, फार्महाऊसमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त; एकाला अटक

Satara News: सुट्यांमुळे पाचगणी पर्यटकांनी गजबजली; रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली गर्दी!

SCROLL FOR NEXT