गुहागरातील १७९ हेक्टर क्षेत्र बाधित
पंचनामे पूर्ण ; ११ लाख ६३ हजारांचे नुकसान, ६२४ शेतकऱ्यांना भरपाई
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५ : पावसाने तालुक्यातील एकूण ६२४ शेतकऱ्यांचे भात व नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या अहवालानुसार १७९ हेक्टर शेती बाधित झाली असून, ७१ गावांमधील एकूण ६२४ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ११ लाख ६३ हजार इतके नुकसान झाले असून, तसा अहवाल शासनाकडे पाठवला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी शेती उत्पादनात ७० ते ७५ टक्के शेती उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत तालुक्यातील ७१ गावांमधील एकूण ६२४ शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये पाटपन्हाळे, साखरी बु., कोंडकारूळ, पालशेत, मारुती मंदिर, बारभाई, निवोशी, वरवेली, मळण, पालपेणे, देवघर, गिमवी, आरे, झोंबडी, चिखली, काजुर्ली, खोडदे, कोतळूक, तवसाळ, हेदवी, वाघांबे, पिंपर, कुटगिरी, वेळणेश्वर, असगोली, कीर्तनवाडी, वरचापाट, शीर, सुरळ, मोहितेवाडी, गुहागर, अडूर, भातगाव तिसंग, जामसूद, कौंढर काळसूद, कोंडवाडी, कुडली, मुसलोंडी, मासू, साखरीआगार, पांगरीतर्फे वेळंब, तळवली, निगुंडळ, शीर बु. आदी गावांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांच्या पावसाने कापणीस तयार असलेली भातशेती बाधित झाली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने भात सुकवण्याच्या जागाही पाण्याखाली गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, कडवा, पावटा, भाजीपाला आणि कंदमुळे लागवडीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. परतीच्या पावसाने भातशेतीसोबत शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत. नुकसानीच्या पंचनाम्यानुसार, ११ लाख ६१ हजार शेती नुकसान झाले असून, एवढ्या भरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्याने दिली.
चौकट
शेतकरी ओळखपत्र त्वरित काढा
शेती नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहेत. ज्यांनी हे ओळखपत्र काढलेले नाहीत त्यांनी त्वरित ऑनलाईन पद्धतीने काढून घ्यावेत. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत; मात्र त्यांना अद्यापही ओळखपत्र मिळाले नाही त्यांनी रजिस्टर नंबर आपल्याजवळ बाळगावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.