कोकण

नेरुर-दुर्गवाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

CD

बिबट्याच्या हल्ल्यात
दोन शेळ्यांचा मृत्यू

नेरुर-दुर्गवाड येथील घटना

कुडाळ, ता. १६ ः नेरुर दुर्गवाड (ता. कुडाळ) परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नेरुर दुर्गवाड येथील हाजीम मुजावर यांच्या दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेरुर दुर्गवड येथील मुजावर यांच्या पाळीव बकऱ्यांवर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. या परिसरामध्ये जवळच गाववस्ती, तसेच धनगरवाडी आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, गावातील अनेक जनावरे रात्रीच्या वेळी बाहेर दावणीला बांधलेली असतात. बिबट्याच्या हल्ल्यामुळे या सर्व जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. गावात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यांनी वनविभागाकडे तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या घटनेची चौकशी करण्याकरिता व पंचनामा करण्यासाठी वनविभागाची टीम तेथे दाखल झाली होती.

Railways Food Courts: रेल्वेकडून केटरिंग धोरणात मोठा बदल! आता केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स सारखे फूड ब्रँड स्थानकांवर उघडणार, पण कधी?

Sangamner News:'संगमनेर तालुक्यात आठ दिवसांत १९२ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती'; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी, पाणीपातळीत वाढ

Chakan News : चाकणमध्ये महामार्गावरून दररोज हजारो कंटेनर-ट्रेलरची वाहतूक; नवले पूल दुर्घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका!

Latest Marathi Breaking News Live : लाल किल्ला स्फोट प्रकरणात आमिर रशीद अलीला अटक

Inspiring Achievement:'पॅरा कमांडो समाधान थोरातचे उल्लेखनीय यश'; गोवा हाफ आयर्नमॅन स्पर्धा ५ तास २८ मिनिटांत पूर्ण..

SCROLL FOR NEXT