कोकण

राजापूर-राजापूर पालिकेत महायुतीची घोषणा

CD

rat१६p२५.jpg-
०४७६५
राजापूरः शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झालेल्या श्रृती ताम्हणकर यांचे अभिनंदन करताना आमदार किरण सामंत आणि महायुतीचे पदाधिकारी.
----------------

राजापूर पालिकेत महायुतीची घोषणा
उमेदवार जाहीर ; जागा वाटपामध्ये भाजपला दोन, शिंदे शिवसेनेला १८
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ : राजापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) - भाजप - राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि सहकारी मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महायुती जाहीर केली. यावेळी महायुतीतर्फे उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. जागा वाटपामध्ये नगरसेवकपदाच्या दोन जागांवर भाजपचे उमेदवार तर, नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या अठरा जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून श्रृती ताम्हणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार किरण सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, राष्ट्रवादीचे बंटी वणजू, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमख अशफाक हाजू, अविनाश लाड, तालुकाप्रमुख दीपक नागले, भाजपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एकनाथ मोंडे उपस्थित होते.
नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून आज जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. त्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या वीसपैकी अठरा जागांवर शिवसेनेचे उमेदवार तर, नगरसेवकपदाच्या दोन जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग-१ (अ) ः सान्वी रावण, प्रभाग-१ (ब) ः सौरभ खडपे, प्रभाग-२ (अ) ः दिलीप चव्हाण, प्रभाग-३ (अ) ः आरती जाधव, प्रभाग-३ (ब) ः दीपक गुरव, प्रभाग-४ (ब) ः दिलीप अमरे, प्रभाग-५ (अ) ः किशोर जाधव, प्रभाग-५ (ब) ः सुमैय्या काझी, प्रभाग-६ (ब) ः खलील सय्यद, प्रभाग-७(ब) ः असीम काझी, प्रभाग-९ (अ) ः नेत्रा सोगम, प्रभाग-९ (ब) ः संजय ओगले, प्रभाग-१० (अ) ः सौरभ पेणकर, प्रभाग-१० (ब) साजिया काझी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपकडून प्रभाग-२ (ब) ः सुयोगा जठार, प्रभाग-७ (अ) ः रसिका कुशे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीतर्फे सोमवारी (ता.१७) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याचे महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

चौकट
चार जागांवरील उमेदवारही आजच ठरणार
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपामध्ये नगरसेवकपदाच्या दहा प्रभागातील वीस जागांपैकी अठरा जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळाल्या आहेत. त्यापैकी सर्वसाधारण महिलासाठी राखीव असलेला प्रभाग-४ (अ), नामप्र महिला राखीव असलेला प्रभाग-६ (अ), प्रभाग-८ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण या दोन, अशा चार जागांवरील अद्यापही उमेदवारी निश्‍चित झालेली नाही. या उमेदवारांची घोषणाही सोमवारीच होईल, असे महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी (ता.१७) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागांवर शिवसेनेकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार० याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहीले आहे.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT