04791
भाजपचे उमेदवार विकासासाठी झटणारे
विशाल परब ः सावंतवाडीत १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः ‘आमच्या पक्षात शिस्त आहे. पक्षाने दिलेला उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असो किंवा राजघराण्यातील, भाजप पक्षात शिस्तीला महत्व आहे. पक्षाचा शब्द खाली पडू दिला जात नाही. श्रद्धाराजे भोसले या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून अन्य उमेदवारही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे, विकासासाठी मेहनत घेणारे आहेत, असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी केले.
येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी आज भाजपकडून श्री. परब यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह नगरसेवक असे एकूण १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी पत्रकाराची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, वेदीका परब, अॅड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर उपस्थित होते.
परब म्हणाले, ‘जगात, देशात, राज्यात आणि कोकणात भाजप नंबर वन होती, आहे अन् राहणार. सावंतवाडी पालिकेत अनेक वर्षे विरोधी मंडळी सत्तेवर होती. आता माझ्या सारखा कार्यकर्त्याला व उमेदवारांना सावंतवाडीकर आशीर्वाद देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. सावंतवाडीचा विकास आणि शहराचा कायापालट नजरेसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्या ठिकाणी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे. सावंतवाडीची जनता सुज्ञ, सुशिक्षित आहे. आमचे उमेदवार सुज्ञ व सुशिक्षित आहेत. मी स्वतः घरोघरी जाणार असून लोकांना विनंती करणार आहे. त्यामुळे जनता निश्चितच आमच्या सोबत राहणार आहे.’
वेदिका परब म्हणाल्या, ‘सावंतवाडीचा विकास करायचा आहे. आमचा विकास हा असा असेल की इथल्या आमदारांनाही विचार करायला लावेल. एक नगरपालिका काय करू शकते हे दाखवून देऊ. भाजपच्या माध्यमातून हा विकास आम्ही करून दाखवू. महाराष्ट्रापासून देशात भाजपची ताकद आहे. त्यामुळे इथला विकास थांबणार नाही.’
---
सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायचीय!
युवराज्ञी सावंत-भोसले म्हणाल्या, ‘श्री देव पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायची आहे. जनतेनं संधी दिली तर ते करून दाखवू. नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास महिलांसाठी सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर राहणार आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.