04795
नझीर राजगुरू
यांचे निधन
सावंतवाडी, ता. १६ ः शहरातील शहा सायकल स्टोअर्सचे मालक नझीर अमिरशहा राजगुरू (वय ७०, रा. कंटक पाणंद) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सायकलवरून नेहमीप्रमाणे कोलगाव ते आकेरी दरम्यान फेरफटका मारत असताना कोलगाव येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गेली पंचवीस वर्षे त्यांचा सावंतवाडी शहरात सायकल स्टोअर्स आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.