बांद्यातील ग्रामस्थांची
उद्या दाणोली पदयात्रा
बांदा ः येथील ग्रामस्थ मंडळींची पुढची पदयात्रा बांदा ते दाणोली श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिर येथे मंगळवारी (ता. १८) होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.