कोकण

बियाणी आणि दागिने

CD

जपूया बीज वारसा ---------------लोगो
(११ नोव्हेंबर टुडे ३)

देवदिवाळी आणि तुळशीचे लग्न झाले की, सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होते. वधू-वर संशोधन आधीच झालेले असते. लग्न मात्र हिवाळ्यात लागतात. आपल्याकडे समाजातील सर्व व्यवहारांवर कृषिसंस्कृतीचा मोठा पगडा आहे. त्यामुळे लग्नासारखे खर्चिक व्यवहार हे खरीप पिके आल्यानंतरच केले जातात. लग्न ठरल्यानंतर महत्त्वाची खरेदी सुरू होते ती म्हणजे दागिन्यांची! सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना आठवण येते प्राचीन भारतातील दगडी आणि फुलांच्या दागिन्यांची!

- rat१७p१.jpg
25O04847
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टिज्ञान संस्था
-------
बियाणी अन् दागिने...

दागिने म्हणजे स्त्रीच्या शृंगारातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सर्व स्त्रियांना विविध प्रकारच्या दागिन्यांची आवड असते. अगदी आदिमकाळापासून आणि पाषाणयुगातही स्त्रिया शंख, हाडे आणि दगडांच्या रंगीबेरंगी मण्यांचे दागिने वापरत असत. आजही दागिन्यांना स्त्रीधन म्हणून कायद्याने मान्यता मिळाली आहे. विविध पौराणिक कथांमध्येही स्त्रीच्या विविध दागिन्यांचा उल्लेख आढळतो. सोन्याचे दागिने भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याने त्याच्यावर भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि कृषीसंस्कृतीचा प्रचंड प्रभाव पडत गेला आहे. त्यामुळे दागिने घडवत असताना पाने, फुले, वेली, बियाणे, भूमितीय, वैदिक रचना या प्रामुख्याने दागिन्यांच्या कलाकुसरीमध्ये दिसून येतात. कृषिप्रधान असणाऱ्‍या भारतासारख्या देशात सोन्याएवढेच मौल्यवान असणाऱ्या धान्याच्या व त्याच्या बियाणांच्या प्रेमापोटी विविध धान्य, बियाणे यांच्या आकाराच्या रचनेचा दागिन्यांमध्ये समाविष्ट केलेला दिसून यतो. महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीचा प्रभाव पारंपरिक दागिन्यांच्या रचनेवर पडलेला दिसून आले आहे. किंबहुना, त्या धान्याच्या नावानेच ते दागिने प्रसिद्ध झाले आहेत. यात ज्वारी, गहू, तांदूळ, जव, बोर, लिंबोणी, आवळा, रायआवळा, चिंच, कारले आदींच्या बियांच्या आकारांपासून प्रेरणा घेत आपले पारंपरिक दागिने तयार झाले आहेत. यात ठुशी, पोहेहार, तांदळी पोत, जव तोडे, बोरमाळ, लिंबोणी माळ, रायआवळा माळ, चिंचपेटी, कारलेपदक अशी ठळक उदाहरणे आहेत.
आजच्या लेखात बियाणांपासून प्रेरित होऊन बनलेल्या काही दागिन्यांची माहिती घेऊया.
* कारले पदक - कारल्याच्या बीसारखा फुगीर आणि दोन्ही बाजूंच्या टोकांकडे निमुळता होत गेलेला सोन्याच्या ठसठशीत लांबट मणी कारले या नावाने ओळखला जातो. असा मणी एखाद्या माळेच्या मध्यभागी जडवून ती माळ गळ्यात घातली जाते.
* गोखरू माळ - गोखरू या काटेदार फळाच्या आकाराचे काटेदार सोन्याचे मणी करून त्यांची माळ बनवली जाते.
* गुंजमाळ – यासाठी रतनगुंजेच्या लालभडक बिया सोन्याच्या तारेत ओवून गुंजमाळ तयार केली जाते.
* वज्रावळ – लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून वज्रावळ माळ त्यांच्या गळ्यात घातली जाते. त्यासाठी गुंजेच्या वेलीच्या काळा ठिपका असलेल्या लाल बिया ओवून ही माळ तयार करतात.
* गव्हाची माळ - गव्हाच्या आकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची माळ केली जाते तिला गव्हाची माळ असे म्हटले जाते.
* जवमाळ - जव म्हणजे यव किंवा सातू या दाण्याच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ असा हा दागिना आहे.
* ज्वारी ठुशी – ज्वारीच्या आकाराचे छोटे छोटे सोन्याचे मणी लाल रंगाच्या धाग्यात पटवून ठुशी तयार केली जाते. ही गळ्याच्या अगदी जवळ घातली जाते.
* जोंधळी पोत - जोंधळ्याच्या अथवा ज्वारीच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ म्हणून ओळखली जाते.
* तांदळी पोत - तांदळाच्या आकारचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे तांदळी पोत.
* जवे - जव किंवा यव धान्याच्या दाण्याच्या आकाराचे सोन्याचे मणी सोन्याच्या बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो, त्या अलंकाराला ‘जवे’ असे नाव आहे.
* रायआवळे हार – रायआवळ्याच्या बियांच्या आकाराचे मणी तयार करून त्यापासून माळ बनवली जाते. त्याला हरपर रेवडी हार असेही म्हटले जाते.
* चिंचपेटी – आजही लोकप्रिय असलेल्या या दागिन्यात चिंचपेटी या दागिन्याचा समावेश होतो. गळ्याला घट्ट बसणारा हा दागिना चिंचोक्याच्या आकाराच्या कोंदणात मोती आणि खडे बसवून तयार केला जातो.
* बोर – केसांच्या भांगेत बिंदीप्रमाणे घालावयाच्या या दागिन्याला कपाळावर लोंबते बोर असते.
* बोरमाळ – बोराच्या बियांच्या आकाराचे सोन्याचे मणी तयार करून त्याची माळ बनवली जाते.
यावर्षीच्या शुभकार्यात अशा प्रकारे बियाणांपासून प्रेरणा घेतलेले दागिने घालून आपली कृषी संस्कृती मिरवायला मिळो याच समस्त स्त्रीवर्गाला देवदिवाळीच्या शुभ कामना!

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT